मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mrunal Thakur New Car : मृणाल ठाकूरने खरेदी केली नवी लग्झरी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क

Mrunal Thakur New Car : मृणाल ठाकूरने खरेदी केली नवी लग्झरी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क

Aarti Vilas Borade HT Marathi

Apr 29, 2023, 10:01 AM IST

    • Mrunal Thakur: मृणाल ठाकूर मुंबई विमानतळावर नुकतीच नव्या कारमध्ये दिसली होती. त्यानंतर तिच्या कारच्या चर्चा रंगल्या आहेत. 
Mrunal Thakur (Instagram/@mrunalthakur)

Mrunal Thakur: मृणाल ठाकूर मुंबई विमानतळावर नुकतीच नव्या कारमध्ये दिसली होती. त्यानंतर तिच्या कारच्या चर्चा रंगल्या आहेत.

    • Mrunal Thakur: मृणाल ठाकूर मुंबई विमानतळावर नुकतीच नव्या कारमध्ये दिसली होती. त्यानंतर तिच्या कारच्या चर्चा रंगल्या आहेत. 

बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. तिने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मृणाल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारताना दिसते. नुकताच मृणालने नवी कार खरेदी केल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ची जोरदार घोषणा! महेश मांजरेकर नाही तर ‘हा’ अभिनेता सांभाळणार सूत्रसंचालनाची धुरा!

‘मिस युनिव्हर्स’ जिंकून पूर्ण झाला ३० वर्षांचा प्रवास! सुष्मिता सेनने मानले ‘या’ व्यक्तीचे आभार

‘थिल्लरपणा चालू केला तुम्ही देवीच्या नावाने’; ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेवर का संतापले प्रेक्षक?

‘बिग बॉस मराठी सीझन ५’ येतोय? आज होणार मोठा खुलासा! नव्या प्रोमोने वाढवली चाहत्यांची आतुरता!

मुंबई एअरपोर्टवर मृणाल ठकूर तिच्या नव्या मर्सिडीज बेंज एस-क्लास 450सह झळकली. त्यानंतर तिच्या कारची चर्चा सोशल मीडियावर बघायला मिळतेय. मृणालच्या शानदार आणि पावरफुल लक्झरी सेडान कारची किंमत २ कोटी आहे. या व्यतिरिक्त मृणालकडे Honda Accord आणि Toyota Fortuner सारख्या कार देखील आहेत. मात्र तिच्या या नव्या कारने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: ३२००० महिला ISISमध्ये कशा सामिल झाल्या? 'या' सिनेमातून उलगडणार रहस्य

कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी मृणाल ठाकूर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सेल्फी या चित्रपटातील 'कुडिए तेरी बाइव'मध्ये दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर ती आदित्य रॉय कपूरच्या गुमराहमध्ये दिसली होती आणि तिचे पुढील चित्रपट 'पिप्पा', 'पूजा मेरी जान' आणि 'आंख' मिचोली लाइनअपमध्ये आहेत.

विभाग

पुढील बातम्या