मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mrunal Thakur : पत्रकार होताहोता झाली अभिनेत्री, जाणून घ्या मृणाल ठाकूर विषयी काही खास गोष्टी

Mrunal Thakur : पत्रकार होताहोता झाली अभिनेत्री, जाणून घ्या मृणाल ठाकूर विषयी काही खास गोष्टी

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 01, 2023, 07:45 AM IST

    • Mrunal Thakur Birthday: एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मृणाल ठाकूरचा आज वाढदिवस आहे. जाणून घ्या तिच्याविषयी काही खास गोष्टी...
Mrunal Thakur (Instagram/@mrunalthakur)

Mrunal Thakur Birthday: एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मृणाल ठाकूरचा आज वाढदिवस आहे. जाणून घ्या तिच्याविषयी काही खास गोष्टी...

    • Mrunal Thakur Birthday: एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मृणाल ठाकूरचा आज वाढदिवस आहे. जाणून घ्या तिच्याविषयी काही खास गोष्टी...

आपल्या अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. तिने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिच्या अभिनयाची आज १ ऑगस्ट रोजी मृणालचा वाढदिवस आहे. जाणून घ्या तिच्या विषयी काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

मृणाल ठाकूरचा जन्म १ ऑगस्ट १९९२ साली धुळे येथे झाला. एका सर्वसामान्य कुटुंबातून आली आहे. तिचे वडील बँकेत कर्माचारी म्हणून काम करत होते. मृणालने पत्रकारितीचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने मुझसे कुछ कहती ये खामोशिया या मालिकेत काम केले. त्यानंतर रिअॅलिटी शो नच बलिएमध्ये ती दिसली होती. तिने कुमकुम भाग्यमध्ये साकारलेल्या बुलबुल भूमिकेने मन जिंकले होते.

२०१८मध्ये तिने लव सोनिया या इंडो अमेरिकन चित्रपटात काम केले. सुपर ३० या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. बादशाहच्या बॅड बॉय एक्स बॅड गॅर्लमध्ये दिसली. त्यानंतर सीता रामम या चित्रपटातील तिचा अभिनय सर्वांचे लक्ष वेधणारा होता. तिच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. एक आउटसायडर असूनही मृणालने चित्रपटसृष्टीमध्ये स्थान निर्माण केले आहे.काही दिवसांपूर्वी मृणालने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. या फेस्टिवलमधील तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले.

यावर्षी मृणालचे चार चित्रपट येणार आहेत. 'पिप्पा', 'नमूने', 'पूजा मेरी जान' आणि 'आँख मिचोली' हे तिच्या चित्रपटांची नावे आहेत. तिच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

विभाग

पुढील बातम्या