मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'अनेक लोक म्हणतात आम्हाला तुमचा खूप राग येतो...', मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत

'अनेक लोक म्हणतात आम्हाला तुमचा खूप राग येतो...', मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत

Payal Shekhar Naik HT Marathi

Jul 31, 2022, 12:00 PM IST

    • 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) मधून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी (milind gawali) यांनी एक पोस्ट करत प्रेक्षकांना त्यांच्याबद्दल काय वाटतं हे लिहिलं आहे. अनेक लोक त्यांना भेटून आम्हाला तुमचा राग येतो अशी भावना व्यक्त करतात.
मिलिंद गवळी

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) मधून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी (milind gawali) यांनी एक पोस्ट करत प्रेक्षकांना त्यांच्याबद्दल काय वाटतं हे लिहिलं आहे. अनेक लोक त्यांना भेटून आम्हाला तुमचा राग येतो अशी भावना व्यक्त करतात.

    • 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) मधून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी (milind gawali) यांनी एक पोस्ट करत प्रेक्षकांना त्यांच्याबद्दल काय वाटतं हे लिहिलं आहे. अनेक लोक त्यांना भेटून आम्हाला तुमचा राग येतो अशी भावना व्यक्त करतात.

कित्येक चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकणारे लोकप्रिय मराठमोळे अभिनेते मिलिंद गवळी सध्या 'आई कुठे काय करते' मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. मात्र या मालिकेत त्यांची नकारात्मक भूमिका असल्याने अनेकदा त्यांना प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. सोबतच प्रेक्षक त्यांच्यावर तेवढंच प्रेमही करतात. याचा दाखला त्यांनी एका पोस्टमधून दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरला बसणार मोठा धक्का

विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी

"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या", सुबोध भावेचे प्रेक्षकांना आवाहान

क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत मिलिंद यांनी लिहिलं, 'चलते चलते मुझे कई लोग मिले,अगदी लहान मुलांन पासून ते 80 - 85 वर्षाचे लोकं माझ्यातल्या अनिरुद्ध ला भेटायला कुतुहलाने, उत्सुकतेने भेटायला येतात. सुरुवातीला बोलायला संकोच करतात, एक फोटो मिळेल का ? माझी आई तुमचा कार्यक्रम बघते ,माझी आज्जी तुमचा कार्यक्रम बघते,अशी सुरुवात होते. मला लोकांना भेटायला आवडतं. म्हणून त्यांचा संकोच,त्यांची भीती घालवण्याचा मी प्रयत्न करतो, एकदा त्यांच्या बद्दल ते बोलायला लागले की मग कळतं, की कोणी डॉक्टर आहे ,मंत्रालयामध्ये डेपोटी कलेक्टर आहे , कोणी IT इंडस्ट्री मधला आहे , कोणाचं हॉटेल ,कोणी वॉचमन ,तर कोणी नर्स, समाजाच्या वेगळ्या वेगळ्या थरातले लोक प्रेमाने येऊन भेटतात , मला खूप छान वाटतं ! काय नातं आहे ? बोलता-बोलता बर्‍याचश्या लोकांकडून हे ऐकायला मिळतं की तुमचा खूप राग येतो, असं बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर छान smile असतं , राग म्हणजे डोळ्यात तिरस्कार नसतो its like we love to Hate you.'

पुढे त्यांनी लिहिलं, 'एक मुलगी म्हणाली, मोजोचा फोटो तुमच्याबरोबर काढायचं. मोजो म्हणजे तिचा लॅब्रेडोर कुत्रा आणि मला कुत्रे अतिशय आवडत असल्यामुळे बराच वेळ छान मोजो शी खेळलो. "आई कुठे काय करते "या सिरीयल मुळे माझं एक वेगळंच नातं लोकांची निर्माण झालाय. हा अनिरुद्ध आपल्या घरातला कोणीतरी आहे ,असं त्यांच्या बोलण्यामध्ये येत आणि तेच मला खूप छान वाटतं . हा आपल्या कुटुंबाचा भाग आहे आणि याला हक्काने आपण भेटावं, याच्याशी बोलावं , असं मला जाणवतं. पूर्वी कॅम्पस campus सीरियल च्या वेळेला “रवि भटनागर” चे कॅरेक्टर character असच लोकप्रिय झालं होतं , त्या वेळेला मी कुठेही गेलो तरी लोक ओळखायचे आणि मी आईबरोबर बाहेर जायचो आणि लोकं माझी सही घ्यायला यायचे, त्यावेळेला माझ्या आईच्या डोळ्यात , आपल्या मुलाबद्दल चा अभिमान मला दिसायचा आणि मग मी ठरवलं आयुष्यात असं काम करायचं, की लोक आपल्यावर प्रेम करतील, मान देतील आणि ते बघून आपलं जवळच्या प्रेमाच्या लोकांना आपला अभिमान वाटेल.'

'काय गंमत आहे बघा आयुष्यात अशा भूमिका वाट्याला आल्या अनिरुद्ध देशमुख , “ कॅम्पस “चा रवी भटनागर, “परिवर्तन “चा निर्मल देव, “बंधन “मधला निम्मा , जे खलनायक आहेत. तरीसुद्धा लोक एवढे प्रेम करतात . खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि त्या माझ्या वर प्रेम करणाऱ्या असंख्य प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो आणि नक्कीच हे सगळं माझी आई आकाशातून बघतच असणारच. आशीर्वादाशिवाय हे असं काही घडू शकत नाही.' त्यांची ही पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरलझाली आहे.

विभाग

पुढील बातम्या