मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Independence Day 2023: कुणी तिरंगा फडकवला, तर कुणी केली खास फॅशन! मराठी कलाकारांनी असा साजरा केला ‘स्वातंत्र्य दिन’

Independence Day 2023: कुणी तिरंगा फडकवला, तर कुणी केली खास फॅशन! मराठी कलाकारांनी असा साजरा केला ‘स्वातंत्र्य दिन’

Aug 15, 2023, 04:47 PM IST

  • Independence Day 2023 Celebration: स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनी हाती तिरंगा हाती घेऊन देखील फोटोशूट केले आहे.

Independence Day 2023 Celebration

Independence Day 2023 Celebration: स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनी हाती तिरंगा हाती घेऊन देखील फोटोशूट केले आहे.

  • Independence Day 2023 Celebration: स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनी हाती तिरंगा हाती घेऊन देखील फोटोशूट केले आहे.

Independence Day 2023 Celebration: आज (१५ ऑगस्ट) देशभरात मोठ्या जल्लोषात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. तर, मराठी कलाकारांनी देखील खास अंदाजात चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने काही कलाकारांनी पांढरे कपडे तर, काहींनी आपल्या आऊटफिटमध्ये तिरंगी रंगांचा समावेश केला आहे. मराठी मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनी हाती तिरंगा हाती घेऊन देखील फोटोशूट केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

‘मराठी बिग बॉस’नंतर हिंदी बिग बॉसमध्ये देखील आपला जलवा दाखवणारा अभिनेता शिव ठाकरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. ‘स्वातंत्र्य दिना’चं निमित्त साधत शिव ठाकरे याने एक खास व्हिडीओ शूट केला आहे, जो त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Akshay Kumar: अखेर अक्षय कुमार झाला भारताचा नागरिक! खास फोटो शेअर करत म्हणाला...

‘बाईपण भारी देवा’ चित्रपट आणि ‘तू चाल पुढं’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री दीपा परब-चौधरी हिने देखील पांढरा ड्रेस आणि हिरवा दुपट्टा परिधान करून फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक सुंदर गोल्डन साडीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या पार्श्वभूमीवर तिरंगी रंगांची उधळण होताना दिसत आहे. या सोनेरी साडीत सई ताम्हणकर खूप सुंदर दिसत आहे.

‘आई कुठे काय करते’ फेम अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी आपल्या घराच्या बालकनीत तिरंगा फडकावत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभाग घेतला आहे. त्यांनी आपल्या चाहत्या वर्गाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Milind gawali

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत हिने हातात तिरंगा धरून सुंदरसा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ती अभिमानाने ध्वजाकडे बघताना दिसत आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली बालकलाकार ‘परी’ म्हणजेच मायरा वायकूळ हिने देखील हातात तिरंगा धरून फोटोशूट केलं आहे.

पुढील बातम्या