मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे आज हवे होते; अजिंक्य देव असं का म्हणाले?

Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे आज हवे होते; अजिंक्य देव असं का म्हणाले?

Aarti Vilas Borade HT Marathi

Nov 07, 2023, 10:57 AM IST

  • Ajinkya Deo on Balasaheb Thackeray: अभिनेते अजिंक्य देव यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भाष्य केले. त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आहे.

Ajinkya Deo on Balasaheb Thackeray

Ajinkya Deo on Balasaheb Thackeray: अभिनेते अजिंक्य देव यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भाष्य केले. त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आहे.

  • Ajinkya Deo on Balasaheb Thackeray: अभिनेते अजिंक्य देव यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भाष्य केले. त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील एक काळ गाजवणारे अभिनेते म्हणजे अजिंक्य देव. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

महाराष्ट्रात सध्या सुरु असलेली राजकीय परिस्थिती पाहाता अजिंक्य देव यांना बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली आहे. "बाळासाहेब ठाकरेंना अनेकदा मी भेटलो आहे. त्यांची भेट घेण्यासाठी मी अनेकवेळा मातोश्रीवर गेलो आहे. ठाकरे आणि देव कुटुंबाचे एक नाते आहे. बाळासाहेबांचे कमाल वलय होते. लहानपणी बाळासाहेबांचे वलय माहिती नव्हते. त्यावेळी मी त्यांच्या मांडीवर बसलेलो आहे. पुढे मोठे झाल्यावर त्यांच्याबद्दल कळू लागल" असे अंजिक्य देव म्हणाले.
वाचा: रश्मिका मंदाना ठरली 'डीप फेक'ची बळी, बिग बींनी केली कारवाईची मागणी

पुढे ते म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे हे अद्भूत व्यक्ती आहेत. माझ्या एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते सेटवर आले होते. त्यावेळी बापाचे नाव मोठे करशील असा आशीर्वाद त्यांनी मला दिला होता. त्यांचे बोलणे स्फुर्तीदायक होते. एखादी गोष्ट प्लॅन न करता ते मनापासून बोलत असे. महाराष्ट्राला आज बाळासाहेब ठाकरेंची खरी गरज होती. पण मला त्यांचा आशीर्वाद मिळाला यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजतो. देव कुटुंबाला ठाकरे कुटुंबाने नेहमीच मदत केली आहे."

अजिंक्य देव यांना या मुलाखतीमध्ये त्यांच्या 'माहेरची साडी' या चित्रपटाविषयी देखील वक्तव्य केले. हा सिनेमा आजही प्रेक्षक तितकाच आवडीने पाहतात. या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. या चित्रपटाविषयी बोलताना अजिंक्य देव म्हणाले, "माहेरची साडी' या चित्रपटासाठी मला विजय कोंडकेंनी विचारणा केली होती. पावणे दोन तास ते मला गोष्ट ऐकवत होते. या सिनेमात कुठे टाळ्या मिळतील, महिला कुठे रडतील या सर्व गोष्टी विजय यांना त्यावेळीच माहिती होत्या."

पुढील बातम्या