मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Manyata Dutt: “या बाईने माझ्या भावाला फसवलं", संजय दत्तच्या बहिणीने केले होते मान्यतावर आरोप

Manyata Dutt: “या बाईने माझ्या भावाला फसवलं", संजय दत्तच्या बहिणीने केले होते मान्यतावर आरोप

Aarti Vilas Borade HT Marathi

Jul 22, 2023, 09:30 AM IST

    • Manyata Dutt Birthyday: आज २२ जुलै रोजी संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
Manyata Dutt

Manyata Dutt Birthyday: आज २२ जुलै रोजी संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

    • Manyata Dutt Birthyday: आज २२ जुलै रोजी संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

'ए मामू' म्हणत प्रेक्षकांच्या मने जिंकणारा अभिनेता म्हणजे संजय दत्त. त्याने मान्यता दत्तशी दुसरे लग्न केले आहे. मात्र, एकेकाळी त्याच्या लग्नामुळे बहिण प्रिया दत्त नाखूश होती. तिने मान्यतावर अनेक गंभीर आरोप केले होते. “या बाईने माझ्या भावाला फसवलं" असे प्रिया म्हणाली होती. आज मान्यताचा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

सुनील दत्त आणि नर्गिस यांना तीन मुले. संजय दत्त, प्रिया दत्त आणि नम्रता दत्त अशी तिघांची नावे. सुनील दत्त आणि नर्गिस यांचे त्यांच्या सर्व मुलांवर खूप प्रेम होते. परंतु नर्गिस नंतर सुनील दत्त यांचे निधन झाले आणि त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीवरून भावंडांमध्ये मतभेद होत गेले. संजय दत्तपेक्षा १९ वर्षांनी लहान असलेल्या प्रिया दत्तने २००९ मध्ये मान्यता दत्तवर अनेक आरोप केले होते. तिचा अपमान केला होता. प्रिया म्हणाली होती, "मान्यता संजयची पत्नी नाही किंवा ती सुनील आणि नर्गिस दत्तची सून नाही. या बाईने माझ्या भावाला जाळ्यात अडकवले आहे", असे प्रिया म्हणाली होती.
वाचा: ‘त्या सगळ्या चर्चा केवळ अफवा!’; मधुराणीसोबतच्या नात्यावर प्रमोद प्रभुलकरांचे स्पष्टीकरण

संजय दत्तला जेव्हा हे कळाले तेव्हा त्याला प्रचंड राग आला होता. त्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'प्रिया कुटुंबातील मोठी सदस्य असल्याने त्याने आणि मान्यताने तिला माफ केले आहे. मान्यता ही नर्गिस आणि सुनील दत्त यांची सूनच आहे, यात काही शंका नाही.'

प्रियासोबतच संजयची दुसरी बहिण नम्रताचा देखील संजयच्या लग्नाला विरोध होता. पण तिने कधीही जाहीरपणे काहीच सांगितले नाही. संजय दत्तने नाराज होऊन प्रियाच्या आडनावावर खोचक टीका केली होती. त्यावेळी तो म्हणाला होता की, "लग्नानतंर प्रिया दत्तने तिच्या सासू-सासऱ्यांचे आडनाव आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत."

विभाग

पुढील बातम्या