मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nitin Chandrakant Desai: नितीन देसाईंसोबत शेवटच्या फोनवर काय झाली चर्चा?; महेश मांजरेकरांचा खुलासा

Nitin Chandrakant Desai: नितीन देसाईंसोबत शेवटच्या फोनवर काय झाली चर्चा?; महेश मांजरेकरांचा खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 02, 2023, 11:57 AM IST

    • Mahesh Manjarekar: महेश मांजरेकरांनी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासोबत शेवटची चर्चा काय झाली होती हे सांगितले आहे.
Mahesh Manjarekar

Mahesh Manjarekar: महेश मांजरेकरांनी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासोबत शेवटची चर्चा काय झाली होती हे सांगितले आहे.

    • Mahesh Manjarekar: महेश मांजरेकरांनी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासोबत शेवटची चर्चा काय झाली होती हे सांगितले आहे.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कला दिग्दर्शत नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये स्वत:चे आयुष्य संपवले. नितीन देसाई यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणी चौकशी करत आहेत. नितीन देसाई यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले? या मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

नितीन देसाई यांच्या निधनानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मोठा खुलासा केला आहे. त्या दोघांचे शेवटचे काय बोलणे झाले हे सांगितले आहे. ‘अत्यंत वाईट बातमी आहे. मराठी सिनेमासाठी नितीन देसाई गर्व होते. कलादिग्दर्शकापेक्षा जास्त ते माझे मित्र होते. मी प्रचंड दुःखी आहे. काय बोलावे कळत नाही. समोरच्या माणसाच्या डोक्यात काय सुरु आहे ते आपल्याला कळत नाही… आपल्याला नंतर कळते आपण बोलायला हवे होते का? आपण कधी बोलत नाही मित्र म्हणून भेटत नाही. कलादिग्दर्शक म्हणून ते बेस्ट होतेच’ असे महेश मांजरेकर म्हणाले.
वाचा: 'हम दिल दे चुके सनम' ते 'जोधा अकबर', नितीन देसाईंने केले होते सुपरहिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन

पुढे ते म्हणाले, ‘नितीन देसाई यांनी एक दर्जा निर्माण केला होता. हे मराठी कलाविश्वाचे मोठे नुकसान आहे. दोन – तीन महिन्यांपूर्वी आमचे बोलणे झाले होते. आम्ही बोललो तेव्हा मला ते अगदी शांत झाल्यासारखे वाटले. मराठी माणूस आला की स्टुडीओच्या रेटसाठी आधी ते बजेट विचारायचे. मी ‘शिवाजी राजे भोसले’ त्यांच्या स्टुडिओमध्ये शूट केला. तेव्हा ते मला म्हणाले, तुझा बजेट असेल तेवढे दे. मित्रासाठी नितिन देसाई कायम मदतीसाठी पुढे असायचे.. असा नितीन देसाई होणे नाही..’

गेल्या २० वर्षांपेक्षा आधिक काळ नितीन देसाई कलाविश्वात काम करत होते. त्यांनी 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' अशा अनेक हिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले. त्यांना आजवर चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून पुरस्कार देण्यात आला. आता त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

विभाग

पुढील बातम्या