मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Koffee With Karan 8: 'या' अभिनेत्याला सारा आणि अनन्याने केले एकाच वेळी डेट, करणने खोलली पोल

Koffee With Karan 8: 'या' अभिनेत्याला सारा आणि अनन्याने केले एकाच वेळी डेट, करणने खोलली पोल

Aarti Vilas Borade HT Marathi

Nov 09, 2023, 12:52 PM IST

    • Koffee with karan 8 Sara Ali khan and Ananya Panday: कॉफी विथ करण या शोमध्ये सारा अली खान आणि अनन्या पांडेच्या खासगी आयुष्याविषयी करण जोहरने मोठा खुलासा केला आहे.
Koffee with karan 8

Koffee with karan 8 Sara Ali khan and Ananya Panday: कॉफी विथ करण या शोमध्ये सारा अली खान आणि अनन्या पांडेच्या खासगी आयुष्याविषयी करण जोहरने मोठा खुलासा केला आहे.

    • Koffee with karan 8 Sara Ali khan and Ananya Panday: कॉफी विथ करण या शोमध्ये सारा अली खान आणि अनन्या पांडेच्या खासगी आयुष्याविषयी करण जोहरने मोठा खुलासा केला आहे.

बॉलिवूडचा दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा 'कॉफी विथ करण'चा आठवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोच्या आगामी भागात अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेत्री सारा अली खान हजेरी लावताना दिसणार आहेत. या शोमध्ये करण जोहरने दोघींच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी

"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या", सुबोध भावेचे प्रेक्षकांना आवाहान

क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

वयाच्या १७व्या वर्षी लग्नाची मागणी, मूल न करण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची लव्हस्टोरी

करण जोहरने 'कॉफी विथ करण ८'मध्ये अनन्या पांडे आणि सारा अली खान एकेकाळी एकाच अभिनेत्याला डेट करत असल्याचे सांगितले आहे. 'तुम्ही दोघी एकत्र काम करत आहात. तुम्ही दोघी मैत्रिणी देखील असतात. ही खरच खूप चांगली गोष्ट आहे कारण तुम्ही एकाच अभिनेत्याला डेट करत होतात. तुमचा एक्स बॉयफ्रेंड कॉमन आहे. तुम्ही दोघी कार्तिक आर्यनसोबत एकदम चिल होतात. एकमेकांसोबत एकदम कम्फर्टेबल वाटत होतात. हे तुमच्या दोघींसाठी सोपे होते की कठीण होते?' असा प्रश्न करण जोहरने दोघींना विचारला होता. सारा आणि अनन्याने कार्तिक आर्यनला डेट केल्याचा अनुमान लावला जात आहे.
वाचा: 'ओले आले', नाना पाटेकर-मकरंद अनासपुरेचा नवा मराठी सिनेमा

करणच्या या प्रश्नाचे उत्तर देत सारा म्हणाली की, 'सोपे तर नव्हते. मला फरक नाही पडला असे मी म्हणू शकत नाही. खूप त्रास झाला. पण तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडायचे असते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्यामुळे तुम्ही कधीच असे बोलू शकत नाही की मी या व्यक्तीचे तोंड पाहणार नाही. या गोष्टी शक्य नाहीत.' आता अनन्या यावर काय म्हणाली हे जाणून घेण्यासाठी कॉफी विथ करणचा एपिसोड पाहावा लागेल.

पुढील बातम्या