मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kangana on Agnipath: इस्रायलचा दाखला देत कंगनानं केलं 'अग्निपथ' योजनेचं कौतुक

Kangana on Agnipath: इस्रायलचा दाखला देत कंगनानं केलं 'अग्निपथ' योजनेचं कौतुक

Jun 18, 2022, 03:25 PM IST

    • Kangana Ranaut Praises Agnipath Scheme: लष्करी भरतीसाठी मोदी सरकारनं आणलेल्या 'अग्निपथ' योजनेचं अभिनेत्री कंगना राणावत हिनं तोंडभरून कौतुक केलं आहे. ही काळाची गरज असल्याचं तिनं म्हटलं आहे.
Kangana Ranaut

Kangana Ranaut Praises Agnipath Scheme: लष्करी भरतीसाठी मोदी सरकारनं आणलेल्या 'अग्निपथ' योजनेचं अभिनेत्री कंगना राणावत हिनं तोंडभरून कौतुक केलं आहे. ही काळाची गरज असल्याचं तिनं म्हटलं आहे.

    • Kangana Ranaut Praises Agnipath Scheme: लष्करी भरतीसाठी मोदी सरकारनं आणलेल्या 'अग्निपथ' योजनेचं अभिनेत्री कंगना राणावत हिनं तोंडभरून कौतुक केलं आहे. ही काळाची गरज असल्याचं तिनं म्हटलं आहे.

Kangana Ranaut on Agneepath: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिची राजकीय भूमिका लपून राहिलेली नाही. केंद्रातील मोदी सरकारच्या अनेक भूमिकांचं, निर्णयांचं ती खुलेपणानं समर्थन करत असते. केंद्र सरकारनं नुकत्याच आणलेल्या 'अग्निपथ' योजनेवरून देशभरात आंदोलनाचा भडका उडाला असताना कंगना राणावत हिनं या योजनेचं ठामपणे समर्थन व कौतुक केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

कंगना राणावत हिनं या संदर्भात एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. 'अग्निपथ' योजनेचं समर्थन करताना कंगनानं इस्रायलसारख्या देशांचं उदाहरण दिलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये तरुणांना लष्करी शिक्षण सक्तीचं आहे. या देशांतील हजारो तरुण आपल्या आयुष्याची काही वर्षे लष्कराला देऊन शिस्त व राष्ट्रभक्तीचे धडे घेत असतात. सीमेवर राहून देशाचं संरक्षण करणं किती कठीण असतं याची जाणीव या निमित्तानं तरुणांना होते, असं तिनं म्हटलं आहे.

'अग्निपथ' योजनेकडं केवळ नोकरी, पैसा आणि करिअर बनविण्याची संधी या दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ नये. या योजनेचं महत्त्व त्या सर्वांपेक्षा खूप अधिक आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक मुलाला गुरुकुलात जावं लागत असेल. 'अग्निपथ' हा त्यातलाच एक प्रकार आहे. फक्त इथं तुम्हाला त्याचा आर्थिक मोबदला मिळणार आहे हाच फरक आहे,' असं कंगनानं म्हटलं आहे.

'अग्निपथसारखी योजना ही काळाची गरज आहे. ड्रग्ज व पबजीच्या नादी लागून भरकटत चाललेल्या तरुणाईला अशा प्रकारच्या दिशादर्शनाची निश्चितच गरज आहे. असा निर्णय घेतल्याबद्दल खरंतर सरकारचं कौतुक झालं पाहिजे, असंही तिनं म्हटलं आहे.

चौथ्या दिवशीही विरोध सुरूच

'अग्निपथ' योजनेला होत असलेला विरोध चौथ्या दिवशीही सुरूच आहे. ही योजना मागे घ्यावी अशी मागणी युवा संघटनांनी केली आहे. विरोधी पक्षांनीही यावरून मोदी सरकारला घेरलं आहे. बिहारमध्ये 'अग्निपथ' विरोधात बंदची हाक देण्यात आली असून आंदोलनाचं दक्षिणेच्या राज्यातही पसरलं आहे.

विभाग

पुढील बातम्या