मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kangana on Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचे आकडे बोगस; कंगनाचा दावा

Kangana on Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचे आकडे बोगस; कंगनाचा दावा

Sep 13, 2022, 10:41 AM IST

    • Kangana Ranaut on Brahmastra Box office Collection: 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईचे आकडे बनावट असल्याचा दावा अभिनेत्री कंगना राणावत हिनं केला आहे.
Kangana Ranaut on Brahmastra

Kangana Ranaut on Brahmastra Box office Collection: 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईचे आकडे बनावट असल्याचा दावा अभिनेत्री कंगना राणावत हिनं केला आहे.

    • Kangana Ranaut on Brahmastra Box office Collection: 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईचे आकडे बनावट असल्याचा दावा अभिनेत्री कंगना राणावत हिनं केला आहे.

Kangana Ranaut on Brahmastra Box office Collection: बॉलिवूडमधील घराणेशाही व स्टारकिड्सच्या विरोधात सातत्यानं बोलणारी अभिनेत्री कंगना राणावत हिनं आता स्टारकिड्सच्या चित्रपटांनाही लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. सध्या चर्चेत असलेला रणबीर कपूर व आलिया भट्ट हिच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमावर कंगनानं तोफ डागली आहे. 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईचे आकडे बोगस असल्याचा दावा तिनं केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यानं शनिवारी 'ब्रह्मास्त्र'ची जगभरातील कमाईची आकडेवारी शेअर केली होती. 'ब्रह्मास्त्र'ने भारताबाहेर ७५ कोटी रुपयांची कमाई केल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्यावर कंगनानं पोस्ट करत हे आकडे खोटे असल्याचं म्हटलं आहे.

चित्रपट निर्मात्या-लेखिका एरे मृदुला काथर यांनी 'ब्रह्मास्त्र'च्या फेरफार केलेल्या आकडेवारीबद्दल ट्वीट केलं होतं. हेच ट्वीट कंगनानं शेअर केलं आहे. ‘काही चित्रपट व्यवसाय विश्लेषक ब्रह्मास्त्रच्या बॉक्सऑफिस कलेक्शनचे आकडे सांगण्याचं टाळत आहेत, कारण त्यात बरीच फेरफार करण्यात आली आहे. जे लोक हे उद्योग करत आहेत, त्यांना मोबदल्यात मोठी रक्कम दिली जात आहे. आकड्यांमधील इतका मोठा बदल हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोळ असावा. कारण, ७० टक्क्यांपर्यंत आकडे बदलले गेले आहेत, असं काथर यांनी म्हटलं आहे. काथर यांच्या इन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया देताना कंगनानं ‘ब्रह्मास्त्र’च्या टीमला टोला हाणला आहे. ‘वाह, ही आणखी खालची पातळी आहे, ७० टक्के!’, असं कंगनानं म्हटलं आहे.

Boxofficeindia.com नुसार, 'ब्रह्मास्त्र'ने पहिल्या दिवशी देशभरात ३७ कोटींचा गल्ला जमवला. तर, दोन दिवसांत ही कमाई ७६ कोटींवर गेली आहे.

कंगनानं याआधीही केली होती टीका

'ब्रह्मास्त्र'च्या रिलीजच्या दिवशी कंगनानं या चित्रपटाशी संबंधित सर्व लोकांवर जोरदार निशाणा साधला होता. चित्रपटानं भ्रमनिरास केल्याचं अनेक समीक्षकांनी म्हटलं होतं. त्यावरही कंगनानं प्रतिक्रिया दिली होती. 'खोटं बोलण्याचा प्रयत्न केला की असंच होतं. रणबीर आणि आलिया उत्कृष्ट कलाकार असल्याचं करण जोहर हा त्याच्या प्रत्येक कार्यक्रमातून लोकांच्या मनावर बिंबवत असतो. तर, अयान मुखर्जी हा प्रतिभावंत आहे असं सांगत असतो. लोकांनी यावर विश्वास ठेवावा असं त्याचं म्हणणं असतं.

आयुष्यात एकही चांगला चित्रपट न बनवणाऱ्या दिग्दर्शकानं ६०० कोटी खर्चून बनवलेल्या या चित्रपटाबद्दल काय बोलावं? या चित्रपटाला अर्थपुरवठा करण्यासाठी फॉक्स स्टुडिओ विकावा लागला. या विदुषकांसाठी आणखी किती स्टुडिओ बंद करावे लागणार आहेत?,' असा प्रश्न कंगनानं उपस्थित केला होता.

पुढील बातम्या