मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांच्या शोकसभेतील त्या कृतीमुळे जॉनी लिव्हर ट्रोल, VIDEO VIRAL

Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांच्या शोकसभेतील त्या कृतीमुळे जॉनी लिव्हर ट्रोल, VIDEO VIRAL

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 27, 2022, 09:16 AM IST

    • सध्या सोशल मीडियावर जॉनी लिव्हर यांचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.
जॉनी लिव्हर (HT)

सध्या सोशल मीडियावर जॉनी लिव्हर यांचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

    • सध्या सोशल मीडियावर जॉनी लिव्हर यांचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

अतिशय लोकप्रिय कॉमेडियन, अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. ११ ऑगस्ट रोजी हृदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांना दिल्लीमधील सरकारी रुग्णालय एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पण २१ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, रविवारी संध्याकाळी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी मुंबईत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक कलाकारांनी तेथे हजेरी लावली. मात्र या सभेते फोटोग्राफर्सला हसून पोझ दिल्यामुळे जॉनी लिव्हर यांना ट्रोल करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राजू श्रीवास्तव यांच्या शोकसभेला जॉनी लिव्हर यांनी हजेरी लावल्याचे दिसत आहे. दरम्यान, जॉनी लिव्हर यांनी तेथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सला हसून पोझ दिली. त्यामुळे त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. जॉनी लिव्हर यांना परिस्थितीचे गांभीर्य आहे की नाही अशा कमेंट यूजरने केल्या आहेत.
वाचा: 'चला सुटका झाली', राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर अभिनेत्याची वादग्रस्त कमेंट

राजू श्रीवास्तव यांच्या शोकसभेला जॉनी लिव्हर, सुनील पाल, कपिल शर्मा, भारती सिंग, किकू शारदा यांसारखे अनेक टॉप कॉमेडियन सहभागी झाले होते. शिवाय इतरही काही कलाकार उपस्थित होते. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण जॉनी लिव्हर यांनी फोटोग्राफरला स्माईल दिल्यामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे.

विभाग

पुढील बातम्या