मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sunny Kaushal: विकी कौशलच्या भावाला डेट करतेय कतरिनाची बहिण?

Sunny Kaushal: विकी कौशलच्या भावाला डेट करतेय कतरिनाची बहिण?

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 28, 2023, 06:13 PM IST

    • Sunny Kaushal and Isabelle kaif: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशलचा भाऊ सनी आणि कतरिना कैफची बहिण इजाबेल एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.
Sunny Kaushal and Isabelle kaif

Sunny Kaushal and Isabelle kaif: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशलचा भाऊ सनी आणि कतरिना कैफची बहिण इजाबेल एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

    • Sunny Kaushal and Isabelle kaif: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशलचा भाऊ सनी आणि कतरिना कैफची बहिण इजाबेल एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले. त्यानंतर आता विकी कौशलचा भाऊ,अभिनेता सनी कौशल आणि कतरिनाची बहिण इजाबेल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते दोघे सतत एकत्र फिरताना, डिनर डेटला जाताना दिसत आहेत. विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या वेळीच सनी आणि इजाबेलच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

रविवारी वांद्रे येथे सनी आणि कतरिना एकत्र दिसले होते. त्यावेळी दोघांनीही निळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. इजाबेलने डेनिम टॉप आणि ब्लॅक स्कर्ट घातला होता. तर सनीने निळा शर्ट आणि जीन्स परिधाने केली होती. दोघेही एकाच कारमधून खाली उतरले. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर सनी किंवा इजाबेलने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
वाचा: अक्षय कुमारच्या सिनेमाचे शुटिंग अर्धवट सोडून पळाली होती सुष्मिता सेन

२०२१ मध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नगाठ बांधली. त्यापूर्वी त्यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आहे. ज्याज्या वेळी विकी आणि कैतरिना कुटुंबीयांसोबत दिसले त्या त्या वेळी त्यांच्या फोटोंमध्ये सनी आणि इजाबेल दिसून आले होते.

इजाबेल पूर्वी सनी कौशलचे नाव शर्वरी वाघशी जोडण्यात आले होते. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते मीडियासमोर नाकारले. अनेकदा ते एकत्र फिरताना दिसले. मात्र आता सनीचे नाव इजाबेलशी जोडले जात आहे. याविषयी सूत्रांनी माहिती दिली होती. 'दोघेंचेही कुटुंबीय एकमेकांना ओळखतात. त्यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे. त्यामुळे सतत एकत्र फिरताना दिसतात. याच आधारे अनेकांनी ते एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले. आता ते दोघे एकत्र दिसत नाही. त्या मागचे कारण म्हणजे दोघेही वेगवेगळ्या शहरात आहेत' अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुढील बातम्या