मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gayatri Datar: 'तुला पाहते रे २' येणार प्रेक्षकांच्या भेटीला? गायत्री दातारने मौन

Gayatri Datar: 'तुला पाहते रे २' येणार प्रेक्षकांच्या भेटीला? गायत्री दातारने मौन

Aarti Vilas Borade HT Marathi

Apr 08, 2023, 11:57 AM IST

    • Tula Pahate Re 2: अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिकेत असणारी 'तुला पाहते रे' ही मालिका भलतीच गाजली होती. या मालिकेचा पुढचा भाग येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
तुला पाहाते रे

Tula Pahate Re 2: अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिकेत असणारी 'तुला पाहते रे' ही मालिका भलतीच गाजली होती. या मालिकेचा पुढचा भाग येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

    • Tula Pahate Re 2: अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिकेत असणारी 'तुला पाहते रे' ही मालिका भलतीच गाजली होती. या मालिकेचा पुढचा भाग येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Tula Pahate Re 2: झी मराठी वाहिनीवरील अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिकेत असणारी 'तुला पाहते रे' ही मालिका भलतीच गाजली होती. आता या मालिकेचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटील येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर गायत्री दातारने प्रतिक्रिया देत पूर्ण विराम दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

अर्जुन सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार? मधुभाऊंची केस ठरेल का कारण? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

'तुला पाहते रे' मालिकेत वयाचं मोठं अंतर असूनदेखील हळुवार फुलत जाणारी ईशा आणि विक्रांतची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती. मालिकेच्या प्रत्येक भागापासून ते शिर्षक गीतापर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पण या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिकेचा पुढचा भाग म्हणजेच 'तुला पाहते रे २' येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर स्वत: गायत्रीने प्रतिक्रिया देत पूर्णविराम दिला आहे.
वाचा: एक गुन्हा अन् एकसारखे दिसणारे दोन संशयित; चित्रपटाची कथाच झाली ‘गुमराह’?

चाहते सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून सुबोध आणि गायत्रीला या मालिकेच्या दुसऱ्या भागाबाबत विचारत असतात. नुकताच गायत्रीने आपल्या चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी इन्स्टाग्राम अकाऊंटवरील 'Ask Me anything' सेशन घेतले होते. या,यामध्ये तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. सोबतच गायत्रीने नवीन काहीतरी घडणार असल्याची हिंटसुद्धा दिली आहे.

एका चाहत्याने गायत्रीला 'तुला पाहते रे २'येणार का? येणार का असा प्रश्न विचारला. त्यावर गायत्रीने उत्तर देत 'नो' असे म्हटले आहे. अर्थातच मालिकेचा दुसरा भाग अद्याप तरी येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

विभाग

पुढील बातम्या