मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TMKOC:'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सोडणार का? ‘टप्पू’ म्हणतो...

TMKOC:'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सोडणार का? ‘टप्पू’ म्हणतो...

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 04, 2022, 04:22 PM IST

    • गेल्या काही दिवसांपासून टप्पू मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता टप्पूने यावर प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
राज अनादकट (HT)

गेल्या काही दिवसांपासून टप्पू मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता टप्पूने यावर प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

    • गेल्या काही दिवसांपासून टप्पू मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता टप्पूने यावर प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' या मालिकेतील जेठालाल, बबिता, टप्पू, चंपकलाल, दयाबेन, पोपटलाल आणि इतर सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका गेली १४ वर्षे प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून टप्पू मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता टप्पूने स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत टप्पू ही भूमिका अभिनेता राज अनादकट साकारत आहे. सध्या सुरु असलेल्या चर्चांवर त्याने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. 'माझे चाहते, माझे प्रेक्षक, माझे वेल विशर या सगळ्यांना माहिती आहे की मी किती चांगल्या प्रकारे गुपित ठेवते' असे राज अनादकटने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता टप्पू म्हणजेच राज अनादकट मालिका सोडणार असल्याचे म्हटले जात आहे. राजने देखील स्पष्टपणे याबाबत माहिती दिलेली नाही.

काही दिवसांपूर्वीच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेला १४ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले होते. मालिकेतील सर्व कलाकार, क्रूमेंबर्स, निर्माते यांनी केक कापून आनंद व्यक्त केला.

विभाग

पुढील बातम्या