मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: 'पठाण'मुळे थिएटर मालकांना मिळतायेत धमक्या, काय आहे प्रकरण?

Pathaan: 'पठाण'मुळे थिएटर मालकांना मिळतायेत धमक्या, काय आहे प्रकरण?

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 06, 2023, 08:22 AM IST

    • Pathaan: बांग्लादेशमध्ये पठाण हा चित्रपट थिएटरमध्ये लावल्यामुळे थिएटर मालकांना धमक्या दिल्या जात आहेत.बांग्लादेशमध्ये पठाण हा चित्रपट थिएटरमध्ये लावल्यामुळे थिएटर मालकांना धमक्या दिल्या जात आहेत.
पठाण (HT_PRINT)

Pathaan: बांग्लादेशमध्ये पठाण हा चित्रपट थिएटरमध्ये लावल्यामुळे थिएटर मालकांना धमक्या दिल्या जात आहेत.बांग्लादेशमध्ये पठाण हा चित्रपट थिएटरमध्ये लावल्यामुळे थिएटर मालकांना धमक्या दिल्या जात आहेत.

    • Pathaan: बांग्लादेशमध्ये पठाण हा चित्रपट थिएटरमध्ये लावल्यामुळे थिएटर मालकांना धमक्या दिल्या जात आहेत.बांग्लादेशमध्ये पठाण हा चित्रपट थिएटरमध्ये लावल्यामुळे थिएटर मालकांना धमक्या दिल्या जात आहेत.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'पठाण' हा चित्रपट रिलीज होऊन आत तब्बल एक महिना उलटून गेला आहे. आजही ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. जवळपास महिनाभरानंतरही हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहे. अशातच बांग्लादेशमध्ये पठाण चित्रपटगृहामध्ये लावणाऱ्या थिएटर मालकांना धमक्यांचे फोन जात असल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरला बसणार मोठा धक्का

विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी

"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या", सुबोध भावेचे प्रेक्षकांना आवाहान

क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

२०१४मध्ये बांग्लादेशी सरकारने बॉलिवूड चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. पण काही दिवसांनंतर हा बॅन हटवण्यात आला. त्यामुळे बॅननंतर बांगलादेशमध्ये प्रदर्शित होणारा पठाण हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. मात्र आता आणखी अडचणी वाढल्याचे समोर आले आहे. थिएटर मालक आणि प्रेक्षकांना हा चित्रपट प्रदर्शित व्हावा असे वाटते. मात्र चित्रपटगृहाच्या मालकांना येणाऱ्या धमक्यांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा पुन्हा विचार केला जात आहे.
वाचा: हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुष्मिताने स्वत: दिली प्रकृती माहिती

समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, बांग्लादेशन मोशन पिक्चर्स एग्सिबिटर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, पठाण चित्रपट लावला तर आम्ही एक एक थिएटर बंद करु अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नाही असे थिएटर मालकांनी म्हटले आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा हाय अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपट गेल्या महिन्यात २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला दमदार ओपनिंगही मिळाली होती. ‘पठाण’मध्ये शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. दीपिका पदुकोणनेही या चित्रपटात अॅक्शन सीन्स केले आहेत. या चित्रपटामध्ये सलमान खानही कॅमिओ भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाने जगभरात १ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘पठाण’ रिलीजच्या पहिल्या टप्प्यात १००० कोटी कमावणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.

विभाग

पुढील बातम्या