मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Har Har Mahadev: भगवा ज्याचा श्वास तो मराठा; 'हर हर महादेव'चा ट्रेलर चर्चेत

Har Har Mahadev: भगवा ज्याचा श्वास तो मराठा; 'हर हर महादेव'चा ट्रेलर चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 11, 2022, 12:56 PM IST

    • Har Har Mahadev Trailer: सध्या सोशल मीडियावर हर हर महादेव चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत असून चित्रपटातील डायलॉगने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
हर हर महादेव (HT)

Har Har Mahadev Trailer: सध्या सोशल मीडियावर हर हर महादेव चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत असून चित्रपटातील डायलॉगने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

    • Har Har Mahadev Trailer: सध्या सोशल मीडियावर हर हर महादेव चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत असून चित्रपटातील डायलॉगने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

'हर हर महादेव' चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, शरद केळकर बाजीप्रभूंच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. आता बहुप्रतिक्षित, बहुभाषिक चित्रपट 'हर हर महादेव'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, या ऐतिहासिक गाथेचे साक्षीदार होण्यासाठी दर्शक कमालीचे उत्सुक आहेत. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटाविषयी अधिकाधिक जाणून घेण्यास प्रेक्षक आतुर असतानाच, आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे बाजी प्रभू देशपांडे यांचा प्रवास पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'या' मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर निर्मात्यांनी 'हर हर महादेव'या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ट्रेलरमध्ये बाजीप्रभूंच्या प्रेरणादायी कथेचे परिपूर्ण चित्रण असून, पॉवर-पॅक्ड पार्श्वसंगीतासह तो भरपूर मनोरंजक झाला आहे. अलीकडेच, निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता ज्याने अनोखा रोमांचक असा अनुभव दर्शकांना दिला.
वाचा: 'प्रेमाचा पाठलाग करतेय', ऋषभ पंत पाठोपाठ उर्वशी पोहोचली ऑस्ट्रेलिया

हा चित्रपट आपल्या इतिहासातील सत्य आणि प्रेरणादायी कथेवर आधारित असून, बाजीप्रभूंच्या नेतृत्वाखाली जिथे केवळ ३०० मावळ्यांनी तब्बल १२००० शत्रू सैन्याला लढा देऊन विजय मिळवला. या पराक्रमाचे वर्णन या चित्रपटात केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील हा पहिलाच बहुभाषिक चित्रपट असल्याने देशभरातील जनतेला देखील या रोमहर्षक इतिहासाचे साक्षीदार होता येणार आहे.

'हर हर महादेव' या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांनी केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर आणि सायली संजीव यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट २५ ऑक्टोबर २०२२ रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.

पुढील बातम्या