मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’मध्ये अमृता खानविलकरची एण्ट्री, साकारणार ‘ही’ भूमिका

Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’मध्ये अमृता खानविलकरची एण्ट्री, साकारणार ‘ही’ भूमिका

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 09, 2022, 10:08 AM IST

    • या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे तर शरद केळकर बाजीप्रभूंच्या भूमिकेत दिसणार आहे. आता अमृता कोणती भूमिका साकारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हर हर महादेव (HT)

या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे तर शरद केळकर बाजीप्रभूंच्या भूमिकेत दिसणार आहे. आता अमृता कोणती भूमिका साकारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

    • या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे तर शरद केळकर बाजीप्रभूंच्या भूमिकेत दिसणार आहे. आता अमृता कोणती भूमिका साकारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

'हर हर महादेव' चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, शरद केळकर बाजीप्रभूंच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. या चित्रपटातील अजून एक अत्यंत महत्वाचे आणि ताकदीचे पात्र म्हणजे सोनाबाई देशपांडे यांचे. सोनाबाईंची भूमिका कोण साकारणार हे गुपित आता उघड झाले आहे. ज्यांच्या नावाने बारा मावळ दणाणतात, असे बाजीप्रभू देशपांडे आणि ज्यांच्या नावाने बाजीप्रभू देशपांडे दणाणतात अशा सोनाबाई आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'या' मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

फक्त मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या कर्तृत्वशैलीने नाव कमावणारी बहुगुणी अभिनेत्री अमृता खानविलकर खंबीर सोनाबाईंची भूमिका साकारणार आहे. 'हर हर महादेव' हा अमृताचा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. अमृताने अनेक चित्रपटांतून एकापेक्षा एक भूमिका साकारून प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. दिलखेचक अदांनी घायाळ करणारी भूमिका असो किंवा नृत्य अमृता नेहमीच चर्चेत राहिली आहे. आपण अमृताला नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत पाहिले आहे. यावेळेस ती करारी अशा सोनाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. मावळ मधील स्त्रियांचा अभिमान म्हणजे सोनाबाई. प्रेमळ तरी वेळ पडता पतीचा कान पिळणाऱ्या अशा सोनाबाईंची भूमिका निभावणं काही सोपं नाही. अशा एका वेगळ्या भूमिकेत अमृताला पाहाण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.
वाचा: अमोल कोल्हे यांनी उलगडला 'शिवप्रताप गरुडझेप'चा प्रवास

भारताचा इतिहास प्रत्येकाला कळावा, म्हणून एक नाही, दोन नाही तर तब्बल पाच विविध भाषांतून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिजीत देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या 'हर हर महादेव' या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स'ची आहे. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला 'हर हर महादेव' सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

विभाग

पुढील बातम्या