मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Har Har Mahadev: बॉक्सऑफिसवर 'हर हर महादेव'ची गर्जना; अवघ्या चार दिवसांत…

Har Har Mahadev: बॉक्सऑफिसवर 'हर हर महादेव'ची गर्जना; अवघ्या चार दिवसांत…

Oct 29, 2022, 12:25 PM IST

  • Har Har Mahadev Box Office Collection: अक्षय कुमार व अजय देवगण या सुपरस्टार्सचे चित्रपट थिएटरमध्ये असतानाही ‘हर हर महादेव’ हा मराठी सिनेमा तिकीटबारीवर गर्जत आहे.

Har Har Mahadev

Har Har Mahadev Box Office Collection: अक्षय कुमार व अजय देवगण या सुपरस्टार्सचे चित्रपट थिएटरमध्ये असतानाही ‘हर हर महादेव’ हा मराठी सिनेमा तिकीटबारीवर गर्जत आहे.

  • Har Har Mahadev Box Office Collection: अक्षय कुमार व अजय देवगण या सुपरस्टार्सचे चित्रपट थिएटरमध्ये असतानाही ‘हर हर महादेव’ हा मराठी सिनेमा तिकीटबारीवर गर्जत आहे.

Har Har Mahadev Box Office Collection: ऐन दिवाळीत थिएटरमध्ये झळकलेला अक्षय कुमारचा 'राम सेतू' आणि अजय देवगणचा 'थँक गॉड' या चित्रपटांची सध्या चर्चा आहे. कोणी किती कमावले याची आकडेमोड सुरू आहे. मात्र, या दोन्ही चित्रपटांना 'आवाज' देत शरद केळकरचा 'हर हर महादेव' बॉक्सऑफिसवर गर्जना करत आहे. तुलनेनं फारच कमी बजेटमध्ये तयार झालेल्या 'हर हर महादेव'नं अवघ्या चार दिवसांत निम्मा खर्च वसूल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'या' मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

अभिनेता शरद केळकर व सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट देशभरात विविध भाषांत प्रदर्शित झालेला पहिला मराठी चित्रपट आहे. समीक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. प्रेक्षकांचाही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. थँक गॉड आणि राम सेतूची स्पर्धा असतानाही 'हर हर महादेव'नं पहिल्या दिवशी २ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी १.१७ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी ९४ लाख रुपयांची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी हा चित्रपट पाऊण कोटींचा गल्ला जमवेल असा अंदाज आहे. आता चित्रपटानं एकूण ४.८६ कोटी रुपये कमावले आहेत. "हर हर महादेव'चं बजेट दहा कोटींच्या आसपास आहे. आतापर्यंतची कमाई पाहता अर्धे पैसे वसूल झाले आहेत. 

थँक गॉडचं काय?

अजय देवगण, रकुल प्रीत सिंह आणि सिद्धार्थच्या 'थँक गॉड'ला पहिल्या दिवशी ‘राम सेतू’नं जोरदार दणका दिला होता. या चित्रपटानं पहिल्या दिवशी केवळ ८.१० कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ६ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी ४.१५ कोटींपर्यंत मजल मारता आली. 'थँक गॉड'ला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होत चालला आहे, त्यामुळं हा चित्रपट खर्च तरी वसूल करेल की नाही याबाबत शंका आहे.

राम सेतूची कमाई किती?

अक्षय कुमारच्या राम सेतूनं पहिल्या दिवशी चांगलं कलेक्शन केलं. या चित्रपटानं अजय देवगणच्या चित्रपटापेक्षा जवळपास दुप्पट कमाई केली. इतकंच नव्हे, ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा हा चालू वर्षातील दुसरा सिनेमा ठरला आहे. 'राम सेतू'नं पहिल्या दिवशी १५.२५ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी ११.४० कोटी तर तिसर्‍या दिवशी ८.४५ कोटी रुपये कमावले. अर्ली ट्रेंडनुसार चौथ्या दिवशी हा चित्रपट ७ कोटींपर्यंत मजल मारू शकतो.

पुढील बातम्या