मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sanjay Dutt Birthday: पहिल्या चित्रपटानंतरच नशेच्या आहारी गेला होता संजय दत्त? वाचा अभिनेत्याबद्दल....

Sanjay Dutt Birthday: पहिल्या चित्रपटानंतरच नशेच्या आहारी गेला होता संजय दत्त? वाचा अभिनेत्याबद्दल....

Jul 29, 2023, 07:00 AM IST

  • Happy Birthday Sanjay Dutt: संजय दत्तला ड्रग्जचं एवढं घाणेरडं व्यसन जडलं होतं की, अनेक मोठमोठे चित्रपट त्याच्या हातातून निघून गेले होते.

Sanjay Dutt

Happy Birthday Sanjay Dutt: संजय दत्तला ड्रग्जचं एवढं घाणेरडं व्यसन जडलं होतं की, अनेक मोठमोठे चित्रपट त्याच्या हातातून निघून गेले होते.

  • Happy Birthday Sanjay Dutt: संजय दत्तला ड्रग्जचं एवढं घाणेरडं व्यसन जडलं होतं की, अनेक मोठमोठे चित्रपट त्याच्या हातातून निघून गेले होते.

Happy Birthday Sanjay Dutt: बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्त आज (२९ जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. 'रॉकी' या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या संजय दत्तने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. 'नायक'पासून 'खलनायक'पर्यंत संजय दत्तने अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. संजय दत्तला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधून वेगळी ओळख मिळाली. पण, संजय दत्तच्या रील लाईफप्रमाणेच त्याचे रिअल आयुष्यही अनेक वादात अडकले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

तारुण्यात असताना संजय दत्तने अनेक चुकीचे मार्ग निवडले होते. या चुकीच्या मार्गांमुळे त्यांना आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागले. संजय दत्तचे बहुतेक आयुष्य वादांनी वेढलेले आहे. संजय दत्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यात ड्रग्ज प्रकरणामुळे खूप चर्चेत आला होता. त्याचवेळी मुंबईच्या टाडा न्यायालयाने संजय दत्तला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर, दुसरीकडे अगदी संजय दत्तचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते.

Irshalwadi Landslide: इर्शाळवाडीच्या मदतीसाठी पुढे सरसावले नाट्यक्षेत्र! ‘या’ नाटकांच्या तिकीट विक्रीतून उभारणार निधी

संजय दत्तला ड्रग्जचं एवढं घाणेरडं व्यसन जडलं होतं की, अनेक मोठमोठे चित्रपट त्याच्या हातातून निघून गेले होते. १९८१मध्ये संजय दत्तने 'रॉकी' चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केले होते. या पहिल्या चित्रपटाच्या वेळी संजय दत्तला खूप व्यसन जडले होते. सुनील दत्त आपल्या मुलाच्या अमली पदार्थाच्या व्यसनामुळे खूप नाराज होते. त्याचवेळी एके दिवशी स्वतः संजय दत्तने आपल्या वडिलांना ड्रग्जच्या व्यसनाबद्दल सर्व काही सांगितले. त्यानंतर सुनील दत्त यांनी आपला मुलगा संजय दत्तला घेऊन यूएस रिहॅबिलिटेशन सेंटर गाठलं. या ठिकाणी संजय दत्त दोन वर्षे राहिला होता. या दरम्यान त्याच्या मनात अनेकदा नशेचा विचार आला. पण, संजय दत्तने मनात ठरवले होते की, तो स्वतः ड्रग्ज घेणार नाही आणि कोणाला नाश करूही देणार नाही.

संजय दत्तने पहिल्यांदा सिगारेट ओढली तेव्हा तो अवघ्या ९ वर्षांचा होता. अनेक निर्माते-दिग्दर्शक सुनील दत्तला भेटायला यायचे आणि उरलेल्या सिगारेट तिथेच सोडायचे. संजूबाबा त्या सिगारेट गुपचूप ओढत असे. संजय दत्तला अभ्यासात अजिबात रुची नव्हती. त्याला सुरुवातीपासून फक्त चित्रपटात काम करायचे होते. पण, सुनील दत्त यांनी संजयला शिक्षणाची अट घातली होती. संजय दत्तबद्दल ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती असेल की, तुरुंगात शिक्षा भोगत असताना संजय दत्तने रेडिओ जॉकी बनूनही लोकांचे मनोरंजन केले होते. संजय दत्त तिथे हिंदी, इंग्रजी आणि मराठीत घोषणा देण्याचे काम करायचा.

विभाग

पुढील बातम्या