मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  लक्ष्याच्या आठवणीत चाहते भावूक, 'हम आपके हैं कौन'चा २८ वर्षे जुना व्हिडीओ चर्चेत

लक्ष्याच्या आठवणीत चाहते भावूक, 'हम आपके हैं कौन'चा २८ वर्षे जुना व्हिडीओ चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi

May 24, 2022, 10:49 AM IST

    • व्हिडीओ पाहून एका यूजरने 'लक्ष्मीकांत बेर्डे सर्वोत्कृष्ट कॉमेडी अभिनेता होता.. मिस यू सर' असे म्हटले आहे
हम आपके है कौन (HT)

व्हिडीओ पाहून एका यूजरने 'लक्ष्मीकांत बेर्डे सर्वोत्कृष्ट कॉमेडी अभिनेता होता.. मिस यू सर' असे म्हटले आहे

    • व्हिडीओ पाहून एका यूजरने 'लक्ष्मीकांत बेर्डे सर्वोत्कृष्ट कॉमेडी अभिनेता होता.. मिस यू सर' असे म्हटले आहे

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत जे प्रदर्शित होऊन २० ते २५ वर्षे उलटली असली तरी प्रेक्षक आजही ते तितक्याच आवडीने पाहात असतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'हम आपके हैं कौन.' या चित्रपटात सलमान खान (Salman Khan), माधुरी दीक्षित (madhuri Dixit), रेणुका शहाणे, मोहनीश बहल, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, आलोक नाथ आणि अनुपम खेर हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. आता जवळपास २८ वर्षांनंतर या चित्रपटाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधील दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अप्पी आणि अर्जुनवर का वैतागले प्रेक्षक? थेट मालिकाच संपवायला म्हणतायत...

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

माधुरी दीक्षितच्या फॅन पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'हम आपके है कौन' चित्रपटाचा BTS व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे टफीसोबत दिसत आहेत. माधुरी एका सीनसाठी तयार होत असते. तिच्या शेजारी बसलेल्या लक्ष्याच्या हातात टफी असते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीत चाहते भावूक झाले आहेत.

एका यूजरने कमेंट करत,'बॉलिवूडमधील गोल्डन दिवस' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'लक्ष्मीकांत बेर्डे सर्वोत्कृष्ट कॉमेडी अभिनेता होता.. मिस यू सर' असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एका यूजरने 'लक्ष्या मामा' अशी कमेंट केली आहे.

<p>एम्बेड</p>

'हम आपके है कौन' हा चित्रपट २८ वर्षांपूर्वी १९९४ साली प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटाचा रेकॉर्ड अद्याप कोणत्याही चित्रपटाने मोडलेला नाही. बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट ७,३९,६२,००० प्रेक्षकांनी पाहिला असून लाइफटाइम रेकॉर्डने नंबर वनवर आहे.

पुढील बातम्या