मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dussehra 2023: 'दिल्ली ६' ते 'कहानी'; बॉलिवूडच्या 'या' चित्रपटांमध्ये दिसलाय दसरा सण!

Dussehra 2023: 'दिल्ली ६' ते 'कहानी'; बॉलिवूडच्या 'या' चित्रपटांमध्ये दिसलाय दसरा सण!

Oct 22, 2023, 12:52 PM IST

  • Dussehra 2023 Bollywood Movies: बॉलिवूडमध्ये असे ५ चित्रपट आहेत, ज्यामध्ये दसऱ्याच्या सणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Dussehra 2023 Bollywood Movies

Dussehra 2023 Bollywood Movies: बॉलिवूडमध्ये असे ५ चित्रपट आहेत, ज्यामध्ये दसऱ्याच्या सणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

  • Dussehra 2023 Bollywood Movies: बॉलिवूडमध्ये असे ५ चित्रपट आहेत, ज्यामध्ये दसऱ्याच्या सणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Dussehra 2023 Bollywood Movies: बॉलिवूड चित्रपटांमध्ये सणांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवणे हे यशस्वी समीकरण मानले गेले आहे. काहीवेळा तर, एखादा चित्रपट सणासुदीच्या दिवशी प्रदर्शित करून भरपूर नफा देखील मिळवला जातो. दसरा किंवा विजया दशमी हा देखील असाच एक सण आहे ज्यातून अनेक सामाजिक संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न चित्रपटांनी केला आहेत. अनेक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना दसऱ्याच्या झलक पाहायला मिळाली असेल. पण, बॉलिवूडमध्ये असे ५ चित्रपट आहेत, ज्यामध्ये दसऱ्याच्या सणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

कहानी : विद्या बालनच्या दमदार अभिनयाने सजलेल्या 'कहानी' या चित्रपटाचा क्लायमॅक्स विजया दशमीच्या दिवशी होतो. हा चित्रपट स्त्री शक्तीशी निगडीत आहे. यात विद्याचे पात्र अतिशय दमदार आहे. याचं कथानक दुर्गापूजेदरम्यान घडतं. चित्रपटाच्या शेवटी, दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते, त्यावेळी देवी वाईटाचा अंत करून परत येत असल्याचे दाखवले आहे.

रावण: प्रसिद्ध संगीतकार एआर रहमानच्या संगीताने सजलेला दिग्दर्शक मणिरत्नम यांचा 'रावण' हा चित्रपट रामायणावर आधारित होता. मात्र, या चित्रपटाचा क्लायमॅक्स खूपच वेगळा होता. यात अभिषेक बच्चन-बिरा (रावण), ऐश्वर्या राय बच्चन-रागिणी (सीता), विक्रम-देव (राम) आणि गोविंदा-संजीवनी (हनुमान) होते. मात्र, हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या चित्रपटातही दसरा पाहायला मिळाला होता.

Bigg Boss 17: 'बिग बॉस १७'च्या घरात 'पंगा क्वीन' कंगनाची एंट्री; स्पर्धकांची शाळा घेणार!

दिल्ली ६: अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर यांचा 'दिल्ली ६' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नव्हता. या संपूर्ण चित्रपटाची कथा रामलीलाभोवती फिरते. चित्रपटाच्या कथेसोबतच यात रामायणातील कथा दाखवल्या असून, त्याद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

रा.वन: हा चित्रपट विज्ञानकथा असला तरी त्याचे नाव पौराणिक कथेसारखे सारखे वाटत आहे. या चित्रपटाचा नायक 'रा.वन' ही रावणाची आधुनिक आवृत्ती आहे. रा.वन हा रोबोट असला तरी वाईट प्रवृत्तीचा आहे. त्याच्यापासून मानवतेला वाचवणाऱ्या जी.वनची भूमिका शाहरुखने साकारली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नव्हता.

राम लीला: संजय लीला भन्साली यांच्या या चित्रपटाची कथा 'विजया दशमीला'च संपते. दसऱ्याच्या वेळी रामलीला सोहळा संपल्यावर गावात दोन गटांत युद्धाची शक्यता असते, जी रामला जाणवते. त्यावेळी राम आणि लीला एकमेकांशी लढून मरण्यापेक्षा, एकमेकांना संपवण्याचा निर्णय घेतात. शेवटी दोन्ही गट एकत्र येऊन राम-लीलाचे अंत्यसंस्कार करतात.

विभाग

पुढील बातम्या