मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dobaaraa Box Office: बॉयकॉटनंतरही तापसीच्या 'दोबारा' ला चांगला प्रतिसाद, जाणून घ्या कमाई

Dobaaraa Box Office: बॉयकॉटनंतरही तापसीच्या 'दोबारा' ला चांगला प्रतिसाद, जाणून घ्या कमाई

Payal Shekhar Naik HT Marathi

Aug 21, 2022, 10:39 AM IST

    • Dobaaraa day 2 box office collection: 'दोबारा' हा छोट्या बजेटचा चित्रपट आहे, ज्याने पहिल्याच दिवशी ७२ लाखांची कमाई केली आहे. त्याच वेळी, बॉयकॉट असूनही दोबाराने दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसापेक्षा चांगले कलेक्शन केले आहे.
दोबारा

Dobaaraa day 2 box office collection: 'दोबारा' हा छोट्या बजेटचा चित्रपट आहे, ज्याने पहिल्याच दिवशी ७२ लाखांची कमाई केली आहे. त्याच वेळी, बॉयकॉट असूनही दोबाराने दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसापेक्षा चांगले कलेक्शन केले आहे.

    • Dobaaraa day 2 box office collection: 'दोबारा' हा छोट्या बजेटचा चित्रपट आहे, ज्याने पहिल्याच दिवशी ७२ लाखांची कमाई केली आहे. त्याच वेळी, बॉयकॉट असूनही दोबाराने दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसापेक्षा चांगले कलेक्शन केले आहे.

चित्रपट निर्माते अनुराग कश्यप हे त्यांच्या अनोख्या चित्रपट शैलीसाठी ओळखले जातात आणि त्यांच्या चित्रपटांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. अनुरागचा 'दोबारा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. दोबारा हा छोट्या बजेटचा चित्रपट आहे. तरीही या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७२ लाखांची कमाई केली आहे. दुसरीकडे, बॉयकॉट असूनही 'दोबारा' ने दुस-या दिवशी चांगली कमाई केली असून, येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी चांगली कमाई करण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

किती आहे दुसऱ्या दिवशीची कमाई

तापसीचा 'दोबारा' १९ ऑगस्टला प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकला जात असतानाच या चित्रपटाचे समर्थनही केले जात आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७२ लाखांची कमाई केली होती. त्याचवेळी, sacnilk च्या अहवालानुसार, चित्रपट दुसऱ्या दिवशी ८५ लाखांचा गल्ला जमवू शकतो. परंतु हे फक्त सुरुवातीचे ट्रेण्ड आहेत आणि ही कमाई कमी जास्त असू शकते पण या चित्रपटाची कमाई पहिल्या दिवसापेक्षा जास्त असेल असे बोलले जात आहे.

लीक झाला आहे चित्रपट

हा काही बिग बजेट चित्रपट नाही. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बजेट जवळपास ५० कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत, चित्रपटाची कमी कमाई त्याला हिट, सेमी हिट किंवा सरासरीचा टॅग देखील देऊ शकते. मात्र, चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याच्या बातम्या होत्या, त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर वाईट परिणाम होऊ शकतो.

'दोबारा' हा एक थ्रिलर रहस्यपट आहे ज्यात तापसी, पावेल गुलाटी आणि राहुल भट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काही लोकांनी सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कारही घातला आहे. याबाबत तापसी म्हणाली होती, 'असं काही रोजच घडत असेल तर लोक त्याकडे लक्ष देणं बंद करतात. याला काही अर्थ राहत नाही.'

पुढील बातम्या