मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सीआयडीमधील ऋषीकेशचे कॅश, डॉक्युमेंट गेले चोरीला; म्हणाला हा तर विनोद...

सीआयडीमधील ऋषीकेशचे कॅश, डॉक्युमेंट गेले चोरीला; म्हणाला हा तर विनोद...

Jun 13, 2022, 05:00 PM IST

    • प्रसिद्ध मालिका सीआयडी मध्ये पोलिसाची भुमिका साकारणारा ऋषीकेश पांडे यांचे मुंबईमध्ये पैसे आणि काही महत्त्वाचे कागदपत्रे चोरीला गेले आहे. त्यांनी तक्रार दिली असून याबाबत ते काय म्हणाले ते वाचा.
ऋषीकेश पांडे

प्रसिद्ध मालिका सीआयडी मध्ये पोलिसाची भुमिका साकारणारा ऋषीकेश पांडे यांचे मुंबईमध्ये पैसे आणि काही महत्त्वाचे कागदपत्रे चोरीला गेले आहे. त्यांनी तक्रार दिली असून याबाबत ते काय म्हणाले ते वाचा.

    • प्रसिद्ध मालिका सीआयडी मध्ये पोलिसाची भुमिका साकारणारा ऋषीकेश पांडे यांचे मुंबईमध्ये पैसे आणि काही महत्त्वाचे कागदपत्रे चोरीला गेले आहे. त्यांनी तक्रार दिली असून याबाबत ते काय म्हणाले ते वाचा.

हिंदी लोकप्रि टीव्ही शो सीआयडी (CID) मध्ये इन्स्पेक्टर सचिनची भुमिका साकारणारा अभिनेता ऋषीकेश पांडे याचे पैसे आणि काही महत्त्वाचे कागदपत्रे नुकतेच मुंबई चोरीला गेले. एकीकडे मालिकेमध्ये कठीण केसेस सोडवणाऱ्या इन्स्पेक्टरचे साहित्य चोरीला जाणे म्हणजे मोठा विनोद आहे, असे तो म्हणतो.

ट्रेंडिंग न्यूज

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

काही दिवसांपूर्वी ऋषीकेश पांडे त्यांच्या परिवारासोबत एलिफन्टा केव्ज पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान ते कोलाबा ते तारदेव दरम्यान एसी बसने प्रवास करत होते. त्यांनी साधारण संध्याकाळी ६.३० वाजता दरम्यान बसमध्ये बसले. पण जेव्हा ते पोहोचले त्यावेळी त्यांच्या स्लिंगमध्ये पैसे आणि त्यांची इतर कार्ड नव्हते. रोख रक्कम सोबतच त्यांचे क्रेडिट कार्ड्स, आधार कार्ड. पॅनकार्ड आणि कार बुक चोरीला गेले आहे. याविरुद्ध त्यांनी कोलाबा पोलिस स्टेशन आणि मलाड पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे.

मालिकेमध्ये इन्स्पेक्टरची भुमिका साकारणारा अभिनेता रियल लाइफ मध्ये स्वतः चोरीच्या प्रसंगाला सामोरा जातोय हा मोठा विनोद आहे, असे ऋषीकेश यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "मी सीआयडी इन्स्पेक्टरची भूमिका केली असल्याने, शोमध्ये लोक आमच्याकडे केसेस घेऊन येतात आणि आम्ही त्यांची सोडवणूक करतो, हा एक विनोद झाला. वास्तविक जीवनातही लोक माझ्याकडे समस्या घेऊन यायचे आणि मी ते सोडवायला मदत करायचो. आणि आता मला लुटले गेले आहे! मला आशा आहे की पोलीस विभाग या प्रकरणाचा छडा लावेल."

विभाग

पुढील बातम्या