मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Celina Jaitly: वडील आणि मुलासोबत झोपणारी अभिनेत्री...; सेलिना जेटलीचे ट्रोलरला सडेतोड उत्तर

Celina Jaitly: वडील आणि मुलासोबत झोपणारी अभिनेत्री...; सेलिना जेटलीचे ट्रोलरला सडेतोड उत्तर

Aarti Vilas Borade HT Marathi

Apr 11, 2023, 04:30 PM IST

    • Celina Jaitly: सेलिना जेटलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एका ट्रोलरच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तिने ट्रोलरला चांगलेच सुनावले आहे.
Celina Jaitly

Celina Jaitly: सेलिना जेटलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एका ट्रोलरच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तिने ट्रोलरला चांगलेच सुनावले आहे.

    • Celina Jaitly: सेलिना जेटलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एका ट्रोलरच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तिने ट्रोलरला चांगलेच सुनावले आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे सेलिना जेटली. तिने आजवर काही हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्ये सेलिना खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. लाइमलाइटपासून लांब असणाऱ्या सेलिनाने सोशल मीडिया एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

सेलिना जेठलिने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एका यूजरचे ट्वीट रिट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्या यूजरने 'अनेकवेळा वडील (फिरोज खान) आणि मुलासोबत (फरदीन खान) झोपणारी एकमेव अभिनेत्री सेलिना जेठली' असे म्हटले होते. सेलिनाने हे ट्वीट रिट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.
वाचा: 'चला हवा येऊ दे'मधील कुशल बद्रिके दिसणार चित्रपटात, लूक व्हायरल

सेलिनाने यूजरला रिप्लाय करत, 'आशा आहे की ही पोस्ट केल्यानंतर तुम्हाला जे हवे आहे ते मिळाले असेल. कदाचित तुमच्या आजावर उपचार झाले असतील. तुमची समस्या सोडवण्यासाठी आणखी काही पर्याय आहेत त्याचा देखील तुम्ही वापर करु शकता. जसे की डॉक्टरकडे जाणे' या आशयाचे ट्वीट केले आहे. सेलिनाचे हे ट्वीट पाहून अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे. एका यूजरने 'या व्यक्तीच्या विरोधात मानहानीचा दाव कर' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'अशा माणसांना शिक्षा झाली पाहिजे' असे म्हटले आहे.

सेलिनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिने ‘अपना सपना मनी-मनी’, ‘नो एंट्री’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘जवानी-दीवानी’ या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. तिचे हे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले होते.

विभाग

पुढील बातम्या