मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bus Bai Bus: एक एक आमदार की किंमत तुम क्या जानो...; पंकजा मुंडेंच्या डायलॉगची चर्चा

Bus Bai Bus: एक एक आमदार की किंमत तुम क्या जानो...; पंकजा मुंडेंच्या डायलॉगची चर्चा

Payal Shekhar Naik HT Marathi

Aug 12, 2022, 02:21 PM IST

    • pankaja munde in bus bai bus :छोट्या पडदयावरील 'बस बाई बस' हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. नुकतीच या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. आता त्यांचा एक डायलॉग सर्वत्र व्हायरल होतोय.
पंकजा मुंडे

pankaja munde in bus bai bus :छोट्या पडदयावरील 'बस बाई बस' हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. नुकतीच या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. आता त्यांचा एक डायलॉग सर्वत्र व्हायरल होतोय.

    • pankaja munde in bus bai bus :छोट्या पडदयावरील 'बस बाई बस' हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. नुकतीच या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. आता त्यांचा एक डायलॉग सर्वत्र व्हायरल होतोय.

pankaja munde in Bus Bai Bus : गेल्या महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलाढाल पाहायला मिळाली. मंत्र्यांचं पक्ष सोडणं, दुसऱ्या पक्षाला जाऊन मिळणं, सरकारनं कोसळणं, पुन्हा दुसरं सरकार सत्ता स्थापन करणं. यात सगळ्यात जास्त चर्चेत राहिलं ते आमदारांची खरेदी. तेव्हाही पक्षांनी आमदारांना खरेदी केल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. या बद्दलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस' या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना निरनिराळे प्रश्न विचारून भंडावून सोडलं जातं. या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली आहे. त्यांचे काही प्रोमो वाहिनीने सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

अर्जुन सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार? मधुभाऊंची केस ठरेल का कारण? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

या प्रोमोंमध्ये पंकजा या आमदारांच्या किंमतीबद्दल बोलताना दिसत आहेत. मंचावर उपस्थित स्त्रिया पंकजा यांनी 'एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू' हा डायलॉग वेगळ्या अर्थाने म्हणजे आमदारांच्या अर्थाने म्हणायला सांगतात. त्यावर पंकजा म्हणतात, 'एक एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू' त्यावर तिथे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. आमदारांची खरेदी केल्याचे आरोप आजवर फेटाळण्यात आले असले तरी पंकजा यांच्या चेहऱ्यावरील हसू सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. त्यामुळे हा फक्त एक डायलॉग आहे की वेगळ्याच गोष्टीचा इशारा आहे अशी चर्चा आता नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने लिहिलं, 'आता पंकजा ताई राजकारण सोडून अभिनयात देखील जाऊ शकतात.' दुसऱ्याने लिहिलं, 'हा फक्त डायलॉग नाहीये तर या खरं बोलतायत.' आणखी एकाने लिहिलं, 'हा भाग फार मनोरंजक वाटतोय, अजून खूप गुपितं निघायची आहेत.'त्यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

पुढील बातम्या