मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kesariya: ‘केसरिया’ गाण्याचे भोजपूरी व्हर्जन चर्चेत, तुम्ही पाहिलेत का?

Kesariya: ‘केसरिया’ गाण्याचे भोजपूरी व्हर्जन चर्चेत, तुम्ही पाहिलेत का?

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 10, 2022, 10:09 PM IST

    • Brahmastra kesariya: 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील केसरिया हे गाणे सुपरहिट ठरले होते.
केसरिया (HT)

Brahmastra kesariya: 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील केसरिया हे गाणे सुपरहिट ठरले होते.

    • Brahmastra kesariya: 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील केसरिया हे गाणे सुपरहिट ठरले होते.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'ब्रह्मास्त्र.' या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. चाहत्यांना रणबीर आणि आलियाचा ऑनस्क्रीन रोमॅन्स प्रेक्षकांना भोवला. या चित्रपटातील केसरीया गाण्याने तर सर्वांची मने जिंकली होती. आता या गाण्याचे भोजपूरी व्हर्जन समोर आले आहे. या गाण्याला मूळ गाण्यापेक्षाही जास्त पसंती मिळतेय.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'या' मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

केसरिया या गाण्यात रणबीर आणि आलिया हे डान्स करताना दिसतात. ते वाराणसीच्या रस्त्यावर फिरत असतात. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भोजपुरी व्हर्जनमध्ये बदल पाहायला मिळतो आहे. आलिया आणि रणबीर डान्स करत असताना बॅकग्राऊंड म्यूझिक पूर्णपणे बदलण्यात आले आहे.
वाचा: पहिल्याच आठवड्यात किरण माने बिग बॉसमधून बाहेर?

बॅकग्राऊंडला अभिनेता पवन सिंहचं 'लॉलीपॉप लागेलू' हे गाणे लावण्यात आले आहे. आलिया आणि रणबीर नाचत असताना केसरिया गाण्याऐवजी लॉलीपॉप लागेलू हे गाणे नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहे. त्यामुळे इंटरनेटवर केसरिया गाण्याचे भोजपुरी व्हर्जन चर्चेत आहे.

एका इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच १३ हजार लोकांनी हे गाणे लाइक्स केले आहे.

९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. या चित्रपटासाठी अयानने जवळपास ८ वर्षे घालवली. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), नागार्जुन (nagarjuna), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि मौनी रॉय (Mouni Roy) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाचा दुसरा भाग 'ब्रह्मास्त्र २: देव' याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

विभाग

पुढील बातम्या