मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Brahmastra: अयान मुखर्जीला झटका! पाचव्या दिवशी 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईमध्ये घसरण

Brahmastra: अयान मुखर्जीला झटका! पाचव्या दिवशी 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईमध्ये घसरण

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 14, 2022, 01:10 PM IST

    • Brahmastra Box Office Collection: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मख्य भूमिकेत असणारा 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरत आहे.
ब्रह्मास्त्र (HT)

Brahmastra Box Office Collection: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मख्य भूमिकेत असणारा 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरत आहे.

    • Brahmastra Box Office Collection: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मख्य भूमिकेत असणारा 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. सुरुवातीच्या चार दिवसात चित्रपटाने चांगली कमाई केली. पण आता पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाल्याचे पाहायला मिळते.

ट्रेंडिंग न्यूज

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, चित्रपटाचे हिंदी कलेक्शन आतापर्यंत १३०.५० कोटी रुपये आहे, तर चित्रपटाच्या साऊथ व्हर्जनने १७.२५ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने भारतात जवळपास १४७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने ३६ कोटी रुपयांची कमाई केली, दुसऱ्या दिवशी ४१ कोटी, तिसऱ्या दिवशी ४३.२५ कोटी, चौथ्या दिवशी १६.५० कोटी आणि पाचव्या दिवशी १२. ७५ कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली आहे. चौथी दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे.
वाचा : ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचे आकडे बोगस; कंगनाचा दावा

९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. या चित्रपटासाठी अयानने जवळपास ८ वर्षे घालवली. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), नागार्जुन (nagarjuna), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि मौनी रॉय (Mouni Roy) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाचा दुसरा भाग 'ब्रह्मास्त्र २: देव' याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

विभाग

पुढील बातम्या