मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Brahmastra Box Office Collection: दुसऱ्या शुक्रवारी 'ब्रह्मास्त्र'ची जोरदार कमाई

Brahmastra Box Office Collection: दुसऱ्या शुक्रवारी 'ब्रह्मास्त्र'ची जोरदार कमाई

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 17, 2022, 10:07 AM IST

    • Brahmastra: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मख्य भूमिकेत असणारा 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरत आहे.
ब्रह्मास्त्र (HT)

Brahmastra: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मख्य भूमिकेत असणारा 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरत आहे.

    • Brahmastra: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मख्य भूमिकेत असणारा 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. आता चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात देखील जोरदार कमाई केल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

पहिल्या आठवड्यात 'ब्रह्मास्त्र'ने जवळपास १७४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. वर्ल्डवाइड चित्रपटाने जवळपास ३०० कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. १६ सप्टेंबर रोजी चित्रपटाने १० ते ११ कोटी रुपये कमावले होते. आता दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. आता विकेंडला चित्रपट जवळपास २०० कोटी रुपये कमावण्याची शक्यता आहे.
वाचा: नोरा फतेहीची दुसऱ्यांदा चौकशी; पिंकी ईराणीच्या समोरच बसवले!

समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार, 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईत १५ टक्के वाढ झाली आहे. तसेच चित्रपटाचे स्क्रिननिंग देखील वाढवण्यात आले आहे. दुसऱ्या आठवड्यानंतर चित्रपट आणखी हिट ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. या चित्रपटासाठी अयानने जवळपास ८ वर्षे घालवली. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), नागार्जुन (nagarjuna), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि मौनी रॉय (Mouni Roy) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाचा दुसरा भाग 'ब्रह्मास्त्र २: देव' याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

विभाग

पुढील बातम्या