मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Brahmastra: 'ब्रह्मास्त्र'वरील बॉयकॉट अस्त्र निष्प्रभ, बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई

Brahmastra: 'ब्रह्मास्त्र'वरील बॉयकॉट अस्त्र निष्प्रभ, बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 13, 2022, 12:29 PM IST

    • Brahmastra Box Office Collection: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मख्य भूमिकेत असणारा 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरत आहे.
ब्रह्मास्त्र (HT)

Brahmastra Box Office Collection: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मख्य भूमिकेत असणारा 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरत आहे.

    • Brahmastra Box Office Collection: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मख्य भूमिकेत असणारा 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. आता गेल्या चार दिवसात चित्रपटाने किती कमाई केली हे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ताल करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ब्रह्मास्त्र चित्रपटाची गेल्या चार दिवसातील कमाई सांगितली आहे. हा चित्रपट हायेस्ट नॉन-हॉलिडे ग्रॉसर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सोमवारी चित्रपटाने १७ ते १८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यादिवसचाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन १३७ ते १३९ कोटी रुपये आहे. या चित्रपटाने आठवड्याच्या सुरुवातीला वर्ल्ड वाईड 225 कोटींचा जबरदस्त गल्ला जमवला आहे. तसेच अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
आणखी वाचा : आलिया-रणबीरच्या ब्रह्मास्त्र प्रदर्शित होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर

९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. या चित्रपटासाठी अयानने जवळपास ८ वर्षे घालवली. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), नागार्जुन (nagarjuna), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि मौनी रॉय (Mouni Roy) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाचा दुसरा भाग 'ब्रह्मास्त्र २: देव' याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

विभाग

पुढील बातम्या