मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Arun Bali: टीव्हीचा पडदा गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली काळाच्या पडद्याआड

Arun Bali: टीव्हीचा पडदा गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली काळाच्या पडद्याआड

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 07, 2022, 09:45 AM IST

    • Arun Bali Death: अरुण बाली यांनी वयाच्या ७९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
अरुण बाली (HT)

Arun Bali Death: अरुण बाली यांनी वयाच्या ७९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

    • Arun Bali Death: अरुण बाली यांनी वयाच्या ७९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Arun Bali Passes Away: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज ७ ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. वयाच्या ७९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’, ‘3 इडियट्स’, 'केदारनाथ' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही दिवसांपासून अरुण यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत आज ७ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजता अरुण बाली यांचे निधन झाले. अनेक कलाकार सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत.

अरुण यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात सहाय्यक अभिनेता म्हणून देखील काम केले आहे. शाहरुख खानपासून, अक्षय कुमार आणि सुशांत सिंह राजपूतसारख्या कलाकारांसोबत ते दिसले होते.

विभाग

पुढील बातम्या