मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakhi Sawant: अभिनेत्री राखी सावंतला अटक, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Rakhi Sawant: अभिनेत्री राखी सावंतला अटक, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 19, 2023, 01:22 PM IST

    • Rakhi Sawant Arrested: एका मॉडलेने राखीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिने आंबोली पोलीस ठाण्यात राखी विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर राखीला अटक करण्यात आली आहे.
राखी सावंत (ht)

Rakhi Sawant Arrested: एका मॉडलेने राखीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिने आंबोली पोलीस ठाण्यात राखी विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर राखीला अटक करण्यात आली आहे.

    • Rakhi Sawant Arrested: एका मॉडलेने राखीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिने आंबोली पोलीस ठाण्यात राखी विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर राखीला अटक करण्यात आली आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे ती चर्चेत आहे. आता राखीला अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. राखीला अटक का झाली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अप्पी आणि अर्जुनवर का वैतागले प्रेक्षक? थेट मालिकाच संपवायला म्हणतायत...

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

काही दिवसांपूर्वी राखीने एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्या मॉडेलने आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी राखीला अटक केली आहे. काही वेळातच राखीला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मॉडेलने तक्रार दाखल केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत, नोव्हेंबर २०२२मध्ये राखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेकदा राखीला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. शेवटी आज पोलिसांनी राखीला ताब्यात घेतले असून या प्रकरणी चौकशी सुरु आहे. काल राखीचा एबीए मुंबई सत्र न्यायालयाने फेटळा. त्यानंतर आज राखीला अटक करण्यात आली.

विभाग

पुढील बातम्या