मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सनी लिओनीच्या एकूण संपत्ती विषयी माहितीये का? जाणून घ्या

सनी लिओनीच्या एकूण संपत्ती विषयी माहितीये का? जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi

May 13, 2022, 09:02 AM IST

    • सनीच्या अमेरिकेतील बंगल्याची किंमत ३०कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे
सनी लिओनी

सनीच्या अमेरिकेतील बंगल्याची किंमत ३०कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे

    • सनीच्या अमेरिकेतील बंगल्याची किंमत ३०कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे

एक पॉर्नस्टार म्हणून करिअरला सुरुवात करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. (Sunny leone) आज प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये तिचे नाव घेतले जाते. पण सनीचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. सुरुवातीला तिने अनेक अडल्ट चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर सनी भारतात आली आणि तिचे 'बेबी डॉल' हे गाणे हिट ठरले. या गाण्याने सनीचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. आज १३ मे रोजी सनीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने चला जाणून घेऊया तिच्या एकूण संपत्ती विषयी.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

सनी लिओनी 'बिग बॉस'च्या पाचव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी तिचा चेहरा अनेकांसाठी नवा होता. पण सनीने बिग बॉसच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली होती. आज सनी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती आयटम साँग किंवा चित्रपटांसाठी तगडे मानधन घेते. तिच्या एकूण संपत्तीविषयी जाणून तुम्ही थक्क व्हाल.

एक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सनी लिओनीचे मुंबईत घर, अमेरिकेत फ्लॅट, महागाड्या गाड्या आहेत. या सर्वांची एकूण किंमत ९७ कोटी रुपये आहे. तसेच काही वर्षांपूर्वी सनीने अमेरिकेत विकत घेतलेल्या फ्लॅटची किंमत जवळपास ३० कोटी रुपयाहून जास्त आहे. तिच्या मुंबईतील बंगल्याची किंमत जवळपास ३ कोटी असल्याचे म्हटले जाते.

सनीला करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. तिने २०११ मध्ये डॅनियल वेबरशी लग्न केले. त्यांची पहिली भेट एका पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर हळूहळू त्यांच्या भेटी वाढत गेल्या. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. दोघे रिलेशनशीपमध्ये आले. २०१७मध्ये त्यांनी निशाला दत्तक घेतले. त्यानंतर २०१८मध्ये सरोगसीद्वारे त्यांना जुळी मुले झाली.

पुढील बातम्या