मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुखचे शिक्षण किती माहितीये का?

Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुखचे शिक्षण किती माहितीये का?

Aarti Vilas Borade HT Marathi

Dec 17, 2023, 08:15 AM IST

    • Happy Birthday Riteish Deshmukh: रितेश आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो हृदयांवर राज्य करतो. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याविषयी खास गोष्टी...
Riteish Deshmukh

Happy Birthday Riteish Deshmukh: रितेश आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो हृदयांवर राज्य करतो. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याविषयी खास गोष्टी...

    • Happy Birthday Riteish Deshmukh: रितेश आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो हृदयांवर राज्य करतो. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याविषयी खास गोष्टी...

केवळ विनोदीच भूमिका नव्हे, तर गंभीर भूमिकांमधूनही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. त्याने आजवर काम केलेले जवळपास सर्व चित्रपट हिट ठरले आहेत. त्याचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला 'वेड' हा सिनेमा तर मराठी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला आहे. आज १७ डिसेंबर रोजी रितेशचा ४५वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

'तुझे मेरी कसम' चित्रपटातून रितेशने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याची पत्नी जिनिलीया डिसूझा हिनेही काम केले होते. मात्र, पहिल्या चित्रपटातून त्याला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. २००४मध्ये रिलीज झालेल्या 'मस्ती' चित्रपटातून रितेश देशमुख रातोरात प्रसिद्ध झाला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. रितेश आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो हृदयांवर राज्य करतो. अभिनेता असण्याबरोबरच रितेश देशमुख आर्किटेक्टही आहे.
वाचा: सिद्धार्थ 'सिंघम' टीममध्ये सहभागी! 'इंडियन पुलिस फोर्स'चा टीझर प्रदर्शित

रितेश देशमुखचा जन्म एका राजकीय कुटुंबात झाला. रितेशचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्याचबरोबर रितेशचा भाऊही राजकारणात सक्रिय आहे. अभिनेता असण्यासोबतच रितेश आर्किटेक्ट देखील आहे. त्याने मुंबईच्या कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून आर्किटेक्चरची पदवी घेतली आहे. इतकेच नाही तर, अभिनेता असण्याबरोबरच रितेश एका आर्किटेक्चरल आणि इंटीरियर डिझायनिंग फर्मचा मालक देखील आहे.

अभिनेता आणि आर्किटेक्ट असण्यासोबतच रितेश देशमुख एक प्रसिद्ध निर्माता देखील आहे. त्याने २०१३ मध्ये ‘मुंबई फिल्म कंपनी’ नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. २०१४मध्ये दिवंगत निर्माते निशिकांत कामत निर्मित 'लय भारी' या चित्रपटाद्वारे रितेशने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये राधिका आपटेही मुख्य भूमिकेत झळकली होती. त्यानंतर त्याचा वेड हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली.

पुढील बातम्या