मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  John Abraham: जॉन अब्राहमचा पहिला चित्रपट कोणता? जाणून घ्या

John Abraham: जॉन अब्राहमचा पहिला चित्रपट कोणता? जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi

Dec 17, 2023, 08:03 AM IST

    • John Abraham Birthday: आज जॉन अब्राहमचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...
John Abraham

John Abraham Birthday: आज जॉन अब्राहमचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...

    • John Abraham Birthday: आज जॉन अब्राहमचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...

बॉलिवूडचा ‘पोस्टर बॉय’ म्हणून अभिनेता जॉन अब्राहम ओळखला जातो. आज १७ डिसेंबर रोजी जॉनचा ५१ वा वाढदिवस आहे. वयाची पन्नाशी ओलांडूनही जॉन तरुण कलाकारांना मात देताना दिसतो. १७ डिसेंबर १९७२मध्ये जॉन अब्राहम याचा जन्म केरळमध्ये झाला होता. जॉन अब्राहम याचे वडील मल्याळी ख्रिश्चन, तर आई पारशी होती. त्यामुळे त्याचं संगोपन या दोन्ही धर्माच्या परंपरेनुसार झालं. जॉनने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. महेश भट्ट यांच्या ‘जिस्म’ या चित्रपटातून जॉनने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळा प्रयोग! "शक्तिमान" चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

प्रत्येक 'चौका'तला राडा प्रेक्षकांना पाहाता येणार घर बसल्या, जाणून घ्या कधी आणि कुठे?

मुक्ताच्या आईचा अपघात करणाऱ्याचे नाव आले समोर, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय असेल सागरचे पुढचे पाऊल?

विकेंडला सिनेमा पाहण्यासाठी जाताय? मग जाणून घ्या 'श्रीकांत'ची पहिल्या दिवसाची कमाई

जॉन अब्राहम आज वयाची ५१ वर्ष पूर्ण करत आहे. मात्र, या वयातही त्याचा फिटनेस पाहून चाहत्यांनाही आश्चर्य वाटत आहे. मॉडेलिंगमधून जरी जॉनने आपल्या करिअरची सुरुवात केली असली, तरी सुरुवातीला त्याने नोकरी केली होती. जॉन अब्राहम याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्यास सुरुवात केली होती. त्याला मॉडेलिंगची आवड होतीच. या दरम्यान नोकरी सांभाळून, जॉन मॉडेलिंग देखील करत होता. एका मीडिया कंपनीत तो ‘मीडिया प्लॅनर’ म्हणून काम करत होता. या ठिकाणी त्याला ६५०० रुपये इतका पगार मिळायचा.
वाचा: ठरलं! 'मिसमॅच्ड ३' येणार प्रेक्षकांच्या भेटीला, रोहित सराफची पोस्ट चर्चेत

मॉडेलिंग करत असतानाच त्याने काही म्युझिक व्हिडीओंमध्येही काम करायला सुरुवात केली. यानंतर त्याला परदेशातूनही मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. हाँगकाँग, न्यूयॉर्क, लंडनसारख्या शहरांमध्ये त्याने मॉडेलिंग केली. त्याची मॉडेलिंग कारकीर्द यशस्वी झाली होती. यादरम्यान त्याला अनेक म्युझिक व्हिडीओंच्या ऑफर देखील येऊ लागल्या. पंकज उधास, हंसराज यांसारख्या प्रसिद्ध गायकांच्या म्युझिक अल्बममध्ये जॉनने काम केले. मॉडेलिंगनंतर अभिनय क्षेत्रात काम करायचे ठरवून त्याने एका नमित कपूरच्या अभिनय शाळेत प्रवेश घेतला.

यानंतर जॉनला महेश भट्ट यांच्या ‘जिस्म’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये चमकण्याची संधी मिळाली. ‘जिस्म’ या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम याच्यासोबत अभिनेत्री बिपाशा बासू मुख्य भूमिकेत झळकली होती. यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. २००४मध्ये आलेल्या ‘धूम’ या चित्रपटाने त्याच्या कारकिर्दीला एक वेगळी दिशा मिळवून दिली. ‘गरम मसाला’, ‘टॅक्सी नंबर ९२११’, ‘काबुल एक्सप्रेस’, ‘सलाम-ए-इश्क’, ‘न्यूयॉर्क’, ‘शूटआउट अॅट वडाळा’, ‘मद्रास कॅफे’ असे अनेक हिट चित्रपट त्याने दिले.

पुढील बातम्या