मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi: मी आणि अक्षया…; ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी होण्यावर राणादाची प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi: मी आणि अक्षया…; ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी होण्यावर राणादाची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 09, 2022, 02:59 PM IST

    • Hardik Joshi: हार्दिक जोशीला एका कार्यक्रमात बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
हार्दिक जोशी (HT)

Hardik Joshi: हार्दिक जोशीला एका कार्यक्रमात बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.

    • Hardik Joshi: हार्दिक जोशीला एका कार्यक्रमात बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. लवकरच बिग बॉस मराठीचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अशातच अभिनेता हार्दिक जोशी शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता त्याने स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनची घोषणा झाल्यापासूनच 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील राणादा आणि पाठकबाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता एका कार्यक्रमात हार्दिकला शोमध्ये सहभागी होण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आणखी वाचा : राणादा-पाठकबाईंचे रुपेरी पडद्यावर पदार्पण, थेट लंडनमध्ये चित्रपटाचे शुटिंग

माझी बिग बॉसच्या घरात सहाभागी होणार की नाही याबद्दल लोकांनी शेवटपर्यंत अंदाज लावावा, असे मला वाटते. कारण हे सर्व फार मजेशीर आहे. मला याबद्दल घाईघाईत काहीही उघड करायचे नाही. सर्वांना त्यांचे अंदाज लावू द्या. माझे नाव गेल्या काही महिन्यांपासून यामुळे चर्चेत आहे. पण मला सस्पेन्स कायम ठेवायचा आहे. यात एक वेगळंच थ्रील आहे असे राणादा म्हणाला.

पुढे तो म्हणाला, सध्या मी आणि माझी होणारी पत्नी अक्षया लग्नाच्या तयारीमध्ये व्यग्र आहोत. अनेक मित्र-मैत्रिणींकडे केळवणासाठी जात आहोत. आम्ही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहोत.

विभाग

पुढील बातम्या