मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhagyashree: सुबोध भावे करणार 'मैंने प्यार किया'मधील भाग्यश्रीसोबत काम, पाहा सिनेमाचा ट्रेलर

Bhagyashree: सुबोध भावे करणार 'मैंने प्यार किया'मधील भाग्यश्रीसोबत काम, पाहा सिनेमाचा ट्रेलर

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 12, 2023, 04:06 PM IST

    • Sajini Shinde Ka Viral Video Trailer: भाग्यश्री महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Sajini Shinde Ka Viral Video

Sajini Shinde Ka Viral Video Trailer: भाग्यश्री महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

    • Sajini Shinde Ka Viral Video Trailer: भाग्यश्री महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री. या पहिल्यावहिल्या चित्रपटाने भाग्यश्रीला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. त्यानंतर तिने काही वर्षे इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला. आता भाग्यश्री 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मराठमोळा अभिनेता सुबोध भावे स्क्रीन शेअर असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या 'श्रीकांत'ची जेमतेम कमाई, सहाव्या दिवशी फक्त इतकी कमाई

गौरव मोरेच्या 'मॅड' अदांवर बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत फिदा! पाहा रोमँटिक व्हिडीओ

'हे नाटक नाही, राखीची प्रकृती अतिशय गंभीर आहे', अत्यंत जवळच्या व्यक्तीने दिली माहिती

मुंबईच्या चाळीत जन्मलेला पोरगा आज गाजवतोय बॉलिवूड! जाणून घ्या विकी कौशलविषयी खास गोष्टी

'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' या चित्रपटाच्या १ मिनिटे ३८ सेकंदाचा ट्रेलर एक उत्कंठावर्धक अनुभव देतो. ट्रेलरमध्ये साजिनी शिंदे म्हणजेच अभिनेत्री राधिका मदन कशी आणि का बेपत्ता झाली, तिच्या बेपत्ता होण्यास कोण जबाबदार आहे? याचा अंदाज लावण्यास भाग पाडतो. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर हा उत्सुकता वाढवणार आहे.
वाचा: “इतका कपटीपणा…”, तेजस्विनी पंडितच्या सोशल अकाउंटवर कारवाई होताच रोहित पवार यांनी दिली

'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' चित्रपटाची कथा एका तरुण भौतिकशास्त्र शिक्षिकेची आहे जी रहस्यमय परिस्थितीत गायब होते. एक अनुभवी आणि अत्यंत कुशल गुन्हे शाखेची अन्वेषक, बेला (निम्रत कौर) हरवलेल्या साजिनीला शोधण्यासाठी केस हाती घेते. साजिनाली शोधण्यासाठी बेला प्रयत्नांची पराकाष्टा करत असते. डोळ्यासमोर धुसर असं सर्व दिसत असतानाही ठोस असे तिच्या हाती काही लागत नाही आणि सत्य शोधण्यासाठी ती काळाशी झुंज देत असताना, अनपेक्षित वळणांची मालिका उलगडते.

'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा थरारपट म्हणून ओळखला जाणारा, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख कलागुणांना वाव देताना दिसणार आहे. तसेच हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीचा उत्तम मिलाफ यात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात राधिका मदन, निम्रत कौर, भाग्यश्री, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शशांक शिंदे आणि सुमीत व्यास यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

पुढील बातम्या