मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Phulrani: बालकवींच्या 'या' कवितेचा वापर 'फुलराणी' चित्रपटात, पाहा व्हिडीओ…

Phulrani: बालकवींच्या 'या' कवितेचा वापर 'फुलराणी' चित्रपटात, पाहा व्हिडीओ…

Aarti Vilas Borade HT Marathi

Feb 22, 2023, 12:33 PM IST

    • Subodh Bhave: "हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती" ही कविता सर्वांना आठवत असेल. ही कविता आता चित्रपटात वापरली जाणार आहे.
फुलराणी (HT)

Subodh Bhave: "हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती" ही कविता सर्वांना आठवत असेल. ही कविता आता चित्रपटात वापरली जाणार आहे.

    • Subodh Bhave: "हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती" ही कविता सर्वांना आठवत असेल. ही कविता आता चित्रपटात वापरली जाणार आहे.

"हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती" बालकवींची ही प्रसिद्ध कविता समस्त मराठी जनांच्या हृदयात कायमची कोरली गेली आहे. रसिकांच्या कितीतरी पिढ्या या ‘फुलराणी’ने फुलवल्या. आगामी ‘फुलराणी’ या मराठी चित्रपटातून ही अजरामर कविता गीतरूपाने आपल्या भेटीला येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

संगीतकार निलेश मोहरीर यांनी या कवितेला अनोखा संगीतसाज दिला असून गायक हृषिकेश रानडे आणि गायिका वैशाली सामंत यांच्या स्वरांनी हे गीत सजलं आहे. गायक आणि गायिकेच्या अशा दोन्ही रूपात हे गीत ऐकता येणार आहे. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी, गुरु ठाकूर, मंदार चोळकर यांची असून संगीत निलेश मोहरीर आणि वरुण लिखाते यांचे आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचं आहे. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, प्रियंका बर्वे, हृषिकेश रानडे, आनंदी जोशी, शरयू दाते यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.
वाचा: तिनं श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे पाहिले नसावेत; स्वराच्या लग्नावर साध्वीचे भयंकर बोल

दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी ही ‘फुलराणी’ आपल्यासमोर आणली असून या ‘फुलराणी’ चा अनोखा अंदाज २२ मार्चला आपल्याला चित्रपटगृहात अनुभवायला मिळणार आहे. यातील ‘विक्रम राजाध्यक्ष’ ही भूमिका अभिनेता सुबोध तर कोळी आगरी ठसकेबाज ‘शेवंता’ अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने साकारली आहे.

पुढील बातम्या