मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tapasee pannu: स्टार बनायचं असेल तर रोहितसोबत काम कर, अनुरागच्या सल्ल्यावर तापसीचा पलटवार

Tapasee pannu: स्टार बनायचं असेल तर रोहितसोबत काम कर, अनुरागच्या सल्ल्यावर तापसीचा पलटवार

Payal Shekhar Naik HT Marathi

Aug 19, 2022, 01:33 PM IST

    • dobaara: तापसी आणि अनुरागने दोबाराचं जोरदार प्रमोशन केलं आहे आणि अशाच एका कार्यक्रमात तापसीने सांगितलं की, अनुरागने तिला रागाच्या भरात रोहित शेट्टीच्या चित्रपटात काम करायला सांगितलं.
तापसी पन्नू

dobaara: तापसी आणि अनुरागने दोबाराचं जोरदार प्रमोशन केलं आहे आणि अशाच एका कार्यक्रमात तापसीने सांगितलं की, अनुरागने तिला रागाच्या भरात रोहित शेट्टीच्या चित्रपटात काम करायला सांगितलं.

    • dobaara: तापसी आणि अनुरागने दोबाराचं जोरदार प्रमोशन केलं आहे आणि अशाच एका कार्यक्रमात तापसीने सांगितलं की, अनुरागने तिला रागाच्या भरात रोहित शेट्टीच्या चित्रपटात काम करायला सांगितलं.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या ‘दोबारा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून समीक्षकांकडून त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तापसी आणि अनुरागने 'दोबारा'चं जोरदार प्रमोशन केलं आहे आणि अशाच एका फिल्म इव्हेंटमध्ये तापसीने सांगितलं की, अनुरागने तिला रागात सांगितलं होतं की, स्टार व्हायचं असेल तर रोहित शेट्टीच्या चित्रपटात काम कर.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

'दोबारा' च्या पहिल्याच एडिटवर झालेली तापसी-अनुरागची भांडणे

'दोबारा'च्या एका कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात तापसी आणि अनुरागने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. दुसरीकडे, तापसीने एका प्रश्नावर तिच्या आणि अनुरागच्या नात्याबद्दल सांगितलं की, ते दोघेही कामावरून खूप भांडतात. तापसी म्हणते, 'जेव्हा आम्ही (तापसी आणि अनुराग कश्यप) 'दोबारा' चं पहिलं एडिट पाहिलं, तेव्हा आमच्यात खूप भांडण झालं, मी पहिलं एडिट त्यांच्या घरात पाहिलं. मी म्हणाले ते बरोबर दिसत नाहीये चांगलं नाहीये आणि आम्ही खूप जास्त भांडलो. तेव्हा तो मला रागाने म्हणाला – जर तुला स्टार बनायचे असेल तर माझ्या सोबत काम करू नको रोहित शेट्टी सोबत काम कर.'

तापसीने पुढे ती अनुरागला काय म्हणाली ते देखील सांगितलं, 'मग मी म्हणाले होते की, तो जर मला काम देत असेल तर करेन ना. रोहित काम देत नसेल तर मी काय करू, मला अनुरागसोबतच काम करावे लागेल. हाच एक पर्याय आहे माझ्याकडे.मी काही नाही करू शकत.' तापसी आणि अनुरागची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते, दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि प्रत्येक वेळी त्यांनी त्यांच्या प्रेक्षकांना काही वेगळा आशय देण्याचा प्रयत्न केला आहे.

विभाग

पुढील बातम्या