मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kho Gaye Hum Kahan Review: सोशल मीडियाच्या दुनियेत अडकलेल्या मित्रांची कथा

Kho Gaye Hum Kahan Review: सोशल मीडियाच्या दुनियेत अडकलेल्या मित्रांची कथा

Aarti Vilas Borade HT Marathi

Dec 27, 2023, 10:08 AM IST

    • Ananya Pandey Kho Gaye Hum Kahan Movie Review: 'खो गए हम कहा' हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट कसा आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
Kho Gaye Hum Kahan

Ananya Pandey Kho Gaye Hum Kahan Movie Review: 'खो गए हम कहा' हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट कसा आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

    • Ananya Pandey Kho Gaye Hum Kahan Movie Review: 'खो गए हम कहा' हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट कसा आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

आजकाल ओटीटीवर वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे आणि सीरिज प्रदर्शित होत असल्याचे आपण पाहातो. त्यामध्ये सोशल मीडियाशी संबंधीत असलेल्या मित्रांची कथा दाखवणारा 'खो गए हम कहा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता या चित्रपटाची कथा काय आहे? चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या", सुबोध भावेचे प्रेक्षकांना आवाहान

क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

वयाच्या १७व्या वर्षी लग्नाची मागणी, मूल न करण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची लव्हस्टोरी

'तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे...', आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज

'खो गए हम कहा' या चित्रपटात तीन मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. इमाद अली, अहाना आणि नील परेरा. इमाद प्रचंड श्रीमंत बापाचा मुलगा असतो. त्याला स्टँडअप कॉमेडी करायला आवडते. त्याच्या या मजेशीर स्वभावामुळे त्याने त्याच्यासोबत घडलेली वाईट घटना लपवली आहे. तो टिंडरवर रोज नवीन मुलीसोबत डेटवर जातो. पण त्या मुलींना कधीही कमिटमेंट किंवा भावनिकदृष्ट्या जोडण्याचा प्रयत्न करत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीलाच तो त्याच्या स्टँडअप कॉमेडीने दोन जवळच्या मित्रांची ओळख करुन देतो.
वाचा: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला 'तेजस' होणार ओटीटीवर प्रदर्शित

अहानाने एमबीए केलेले असते. ती एका मोठ्या कंपनीमध्ये काम करत असते. दुसरीकडे नील एक जीम ट्रेनर आहे. इमाद आणि अहाना एकाच घरात रहात असतात. तर नील त्याच्या आई-वडिलांसोबत राहात असतो. नील आणि इमाद दोघांनाही आयुष्यात काय करायचे असते हे माहिती नसते. पण अहाना प्रचंड मेहनत करुनही फार यशस्वी होत नाही. सोबतच तिचा बॉयफ्रेंड तिला सोडून जातो. हे तीन मित्र-मैत्रिणी मिळून आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जातात. तिघांच्याही आयुष्यात सोशल मीडियाचा मोठा परिणाम असतो. आता त्या तिघांसोबत काय होते? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पहावा लागेल.

'खो गए हम कहा' चित्रपटातील अनन्या पांडेचा अभिनय खूप सुंदर आहे. ती अहानाची भूमिका अतिशय योग्य पद्धतीने साकारते. सिद्धार्थ चतुर्वेदीची दोन रुपे आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे त्याचा मजेशीर स्वभाव आणि दुसरा म्हणजे भावनिकदृष्ट्या अडकलेला व्यक्ती. इच्छा असूनपण तो कोणात्याशी इमोशनली जोडला जात नाही.

'दिल चाहता है' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटांनंतर एक्सेल एंटरटेनमेंट तरुण कलाकारांसोबत मैत्रिची एक नवी कथा घेऊन आला आहे. दिग्दर्शक अर्जुन वरैन सिंहने हा चित्रपट तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

विभाग

पुढील बातम्या