मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amruta Fadnavis New Song: 'तुम्हे आईने की जरुरत नही', अमृता फडणवीसांचे नवे गाणे ऐकलेत का?

Amruta Fadnavis New Song: 'तुम्हे आईने की जरुरत नही', अमृता फडणवीसांचे नवे गाणे ऐकलेत का?

Aarti Vilas Borade HT Marathi

Dec 09, 2023, 10:15 AM IST

    • Amruta Fadnavis new song: अमृता फडणवीस यांचे नवे मराठी गाणे हे नुकताच प्रदर्शित झाले आहे. त्यांच्या या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Amruta Fadnavis

Amruta Fadnavis new song: अमृता फडणवीस यांचे नवे मराठी गाणे हे नुकताच प्रदर्शित झाले आहे. त्यांच्या या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

    • Amruta Fadnavis new song: अमृता फडणवीस यांचे नवे मराठी गाणे हे नुकताच प्रदर्शित झाले आहे. त्यांच्या या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांची गाणी प्रदर्शित होतात तर कधी सोशल मीडियावरील पोस्टस सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. नुकतात अमृता यांचे एक गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे तुम्ही ऐकलेत का?

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अप्पी आणि अर्जुनवर का वैतागले प्रेक्षक? थेट मालिकाच संपवायला म्हणतायत...

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी अन् गायिका अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचे नाव 'तुम्हे आईने की जरुरत नही' असे आहे. या गाण्याची लिंक अमृता यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर शेअर केली आहे. 'अत्यंत आनंददायी आणि प्रसन्न करणारे तुम्हे आईने की जरुरत नही हे माझे गाणे प्रदर्शित झाले आहे' असे अमृता यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यासोबतच यूट्यूबची लिंक शेअर केली आहे.
वाचा: मराठमोळ्या मनोरंजनाला इंग्लिशचा तडका! 'लंडन मिसळ'मध्ये 'ही' अभिनेत्री दिसणार दुहेरी भूमिकेत

सोशल मीडियावर अमृता यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांना इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या या नव्या गाण्याची चर्चा होती. अखेर ते चाहत्यांच्या भेटीला आले असून त्यांनी अमृता यांचे कौतुक केले आहे. सध्या सगळीकडे अमृता यांच्या गाण्याची चर्चा आहे.

अमृता फडणवीस नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर, कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. आता त्यांचे 'तुम्हे आईने की जरुरत नही' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या आधी देखील त्यांची काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’ या त्यांच्या गाण्यांना लोकप्रियता मिळाली होती.

विभाग

पुढील बातम्या