मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Allu Arjun: हजारोंची गर्दी अन् ढोल ताशांची मिरवणूक; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घेऊन घरी परतला अल्लू अर्जुन!

Allu Arjun: हजारोंची गर्दी अन् ढोल ताशांची मिरवणूक; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घेऊन घरी परतला अल्लू अर्जुन!

Oct 19, 2023, 08:17 AM IST

  • Allu Arjun Grand Welcome At Home: राष्ट्रीय पुरस्कार घेऊन अभिनेता अल्लू अर्जुन हैदराबादला घरी परतला आहे. यावेळी त्याच्या चाहत्यांनी आणि कुटुंबीयांनी त्याचे भव्य स्वागत केले.

Allu Arjun Grand Welcome

Allu Arjun Grand Welcome At Home: राष्ट्रीय पुरस्कार घेऊन अभिनेता अल्लू अर्जुन हैदराबादला घरी परतला आहे. यावेळी त्याच्या चाहत्यांनी आणि कुटुंबीयांनी त्याचे भव्य स्वागत केले.

  • Allu Arjun Grand Welcome At Home: राष्ट्रीय पुरस्कार घेऊन अभिनेता अल्लू अर्जुन हैदराबादला घरी परतला आहे. यावेळी त्याच्या चाहत्यांनी आणि कुटुंबीयांनी त्याचे भव्य स्वागत केले.

Allu Arjun Grand Welcome At Home: साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याला ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जुन हैदराबादला घरी परतला आहे. यावेळी त्याच्या चाहत्यांनी आणि कुटुंबीयांनी त्याचे भव्य स्वागत केले. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये हजारो चाहत्यांच्या गर्दीत अभिनेत्यावर फुलांचा वर्षाव होताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

मंगळवारी, १७ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अल्लू अर्जुनला २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अल्लू अर्जुनला त्याच्या २० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अभिनेता अल्लू अर्जुन हैदराबादला परतला, तेव्हा तिथे त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. त्याला हा पुरस्कार मिळाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. अल्लू अर्जुनवर चाहत्यांनी फुलांचा वर्षाव केला आणि ढोल-ताशांच्या गजरात त्याचे स्वागत केले.

Sunny Deol Birthday: 'घायल' ते 'गदर'; सनी देओलच्या कारकिर्दीला उंचावणारे 'हे' चित्रपट तुम्ही पाहिले का?

चाहत्यांचे प्रेम आणि अशा प्रकारेचे स्वागत पाहून भारावलेला अल्लू अर्जुन चाहत्यांशी संवाद साधण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. त्याने आपल्या कारमधून बाहेर येऊन, हात जोडून सर्वांचे आभार मानले. इतकेच नाही तर त्याने अनेक चाहत्यांशी हस्तांदोलनही केले. यावेळी अभिनेता ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसला.

अल्लू अर्जुन हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे. या विजयावर आनंद व्यक्त करताना अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने म्हटले होते की, 'राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने मला सन्मानित वाटत आहे. या पुरस्काराबद्दल मी ज्युरी, मंत्रालय, भारत सरकार यांचे आभार मानू इच्छितो. हा पुरस्कार हे केवळ वैयक्तिक यश नाही, तर ज्यांनी आमच्या सिनेमाला पाठिंबा दिला आहे आणि त्याचे कौतुक केले आहे अशा सर्वांसाठी आहे. धन्यवाद, सुकुमार गुरू. माझ्या यशामागे तूच कारण आहेस.'

पुढील बातम्या