मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushpa The Rule: चित्रपटाचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’

Pushpa The Rule: चित्रपटाचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’

Sep 11, 2023, 05:11 PM IST

  • Pushpa 2 Release Date: गेल्या काही महिन्यांपासून चाहते आतुरतेने वाट बघत असलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे.

Pushpa 2 Release Date

Pushpa 2 Release Date: गेल्या काही महिन्यांपासून चाहते आतुरतेने वाट बघत असलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे.

  • Pushpa 2 Release Date: गेल्या काही महिन्यांपासून चाहते आतुरतेने वाट बघत असलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे.

Pushpa 2 Release Date: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चाहते आतुरतेने वाट बघत असलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे. ‘पुष्पा २’ची रिलीज डेट आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजे १५ ऑगस्ट २०२४ रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा : द राइज' अर्थात ‘पुष्पा १’ या चित्रपटाला देशभरातून प्रचंड प्रेम मिळाले होते. हा त्याचा पहिला पॅन इंडिया चित्रपट होता. या चित्रपटाची पटकथा, गाणी आणि अल्लू अर्जुनचा सिग्नेचर डायलॉग 'मैं झुकेगा नही साला' तुफान प्रसिद्ध झाला. आता चाहते दुसऱ्या भागाच्या रिलीजच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. निर्माते वेळोवेळी चित्रपटाशी संबंधित अपडेट्स शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा लूक आणि त्यानंतर टीझर रिलीज करण्यात आला होता. त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदानासोबतचा सेटवरील एक फोटो देखील शेअर करण्यात आला होता. या चित्रपटाचे शूटिंग अजून सुरू आहे.

स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधनाच्या सुट्ट्यांसह लाँग वीकेंडचा मुहूर्त साधून प्रदर्शित होणारा ‘पुष्पा: द रूल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा नवीन विक्रम करू शकतो. अल्लू अर्जुनला नुकत्याच पार पडलेल्या ६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 'पुष्पा'च्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच 'पुष्पा २'च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याची खास झलकही पाहायला मिळाली होती, ज्यामुळे चाहते खूप उत्साहित झाले आहेत. इंस्टाग्रामने त्यांच्या अधिकृत हँडलवर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे अभिनेत्याचे एक दृश्य देखील दाखवले होते.

पुढील बातम्या