मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Alia Bhatt: रणबीर नाही तर 'या' अभिनेत्याची फॅन आहे आलिया भट्ट

Alia Bhatt: रणबीर नाही तर 'या' अभिनेत्याची फॅन आहे आलिया भट्ट

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 27, 2023, 09:52 AM IST

    • Alia Bhatt Favourite Actor: आलिया भट्टला राष्ट्रीय पुरस्कार मिळताच या अभिनेत्याने शुभेच्छा दिल्या होत्या. आलियाने त्याला उत्तर देत मी तुझी चाहती आहे असे म्हटले.
Alia Bhatt (Instagram/@AliaBhatt)

Alia Bhatt Favourite Actor: आलिया भट्टला राष्ट्रीय पुरस्कार मिळताच या अभिनेत्याने शुभेच्छा दिल्या होत्या. आलियाने त्याला उत्तर देत मी तुझी चाहती आहे असे म्हटले.

    • Alia Bhatt Favourite Actor: आलिया भट्टला राष्ट्रीय पुरस्कार मिळताच या अभिनेत्याने शुभेच्छा दिल्या होत्या. आलियाने त्याला उत्तर देत मी तुझी चाहती आहे असे म्हटले.

कलाविश्वातील सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. तर अभिनेत्री क्रिती सेनॉनला 'मिमी' या चित्रपटासाठी देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला 'पुष्पा द राइज' साठी सर्वोत्कृष्ट लीड अभिनेता म्हणून पुरस्कार देण्यात आला. सोशल मीडियावर चाहत्यांनी कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

अभिनेता अल्लू अर्जुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व कलाकार आणि चाहत्यांचे आभार मानले. अल्लूने क्रिती आणि आलियाला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. त्याने 'आलिया तुला खूप खूप शुभेच्छा. तुला हा पुरस्कार मिळावा यासाठी मी वाट पाहात होतो. गंगुबाई काठियावाडीसाठी तुला मिळालेले यश पाहून मी आनंदी आहे' या आशयाचे ट्वीट केले आहे.

आलिया भट्टने अल्लू अर्जुनने ट्वीट रिट्वीट करत उत्तर दिले आहे. 'प्रिय पुष्पा, तुला देखील खुप साऱ्या शुभेच्छा. तुला अभिनय कमाल होता. तुझी सर्वात मोठी चाहती' या आशयाचे ट्वीट आलियाने केले आहे. यावरुन आलियाला अभिनेता अल्लू अर्जुन आवडत असल्याचे समोर आले आहे.

अल्लू अर्जुनने अभिनेत्री क्रिती सेनॉनसाठी देखील ट्वीट केले आहे. ते पाहून क्रितीने 'धन्यवाद अल्लू. तुला देखील खूप खूप शुभेच्छा. मी तुझ्या कामाची खूप मोठी चाहती आहे आणि तू पुष्पाच्या भूमिकेत कमाल दिसत होतास. तू या पुरस्काराचा खऱ्या अर्थाने हक्कदार आहेस' असे म्हणत अल्लूचे आभार मानले आहेत.

विभाग

पुढील बातम्या