मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Video: ब्रेकअपच्या २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच रवीना-अक्षय एकत्र, भेटताच केले कौतुक

Video: ब्रेकअपच्या २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच रवीना-अक्षय एकत्र, भेटताच केले कौतुक

Aarti Vilas Borade HT Marathi

May 08, 2023, 06:42 PM IST

    • Akshay Kumar-Raveena Tandon: अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचे अफेअर जगजाहीर होते. मात्र, ब्रेकअपनंतर त्यांनी कधीही एकमेकांचे तोंड पाहिले नव्हते. आता नुकताच एका कार्यक्रमात ते एकत्र आले. त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Raveena Tandon

Akshay Kumar-Raveena Tandon: अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचे अफेअर जगजाहीर होते. मात्र, ब्रेकअपनंतर त्यांनी कधीही एकमेकांचे तोंड पाहिले नव्हते. आता नुकताच एका कार्यक्रमात ते एकत्र आले. त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    • Akshay Kumar-Raveena Tandon: अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचे अफेअर जगजाहीर होते. मात्र, ब्रेकअपनंतर त्यांनी कधीही एकमेकांचे तोंड पाहिले नव्हते. आता नुकताच एका कार्यक्रमात ते एकत्र आले. त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड कलाकारांचे अफेअर्स आणि ब्रेकअप हे कायम जगजाहीर असतात. ९०च्या दशकातील अशीच एक जोडी म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय आणि अभिनेत्री रवीना टंडन. त्यांचे अफेअर सर्वांना माहिती होते. मात्र, ब्रेकअपनंतर त्यांनी कधीही एकमेकांचे तोंड पाहिले नव्हते. आता ब्रेकअपच्या जवळपास २२ वर्षांनंतर ते एकत्र दिसले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

रविवारी ७ मे रोजी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. त्या दोघांना एकत्र स्टेजवर बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमातील त्यांचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: चाहता म्हणाला आर्यनला कपड्यांची किंमत जरा कमी करायला सांगा! शाहरुख म्हणतो....

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अक्षय आणि रवीना स्टेजवर एकत्र उभे असल्याचे दिसत आहे. चाहत्यांसाठी हा धक्काच होता. त्यावेळी रवीना अक्षय कुमारचे कौतुक करत म्हणाली की, “९० च्या दशकातील एक रॉकस्टार, जो आजही रॉकस्टार आहे आणि जो नेहमीच रॉकस्टार राहील.” चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहताच लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

एका यूजरने कमेंट करत “या दोघांना एकत्र पाहण्याचं स्वप्न पूर्ण झालं” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'आम्ही काय पाहात आहोत, हे तर अशक्यच आहे' असे म्हटले आहे. त्यांच्या या व्हिडीओवरच्या कमेंट देखील वाचण्यासारख्या आहेत.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये रवीनाने अक्षयसोबतच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली होती. “अक्षयशी ब्रेकअपनंतर मी दुसऱ्या कोणास तरी डेट करू लागली आणि अक्षयही इतर कुणाला तरी डेट करत होता, त्यामुळे मला कधीच वाईट वाटले नाही” असे रवीना म्हणाली होती.

पुढील बातम्या