मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आमिर खानपासून अक्षय कुमारपर्यंत; ९० च्या दशकात किती फी घेत होते हे कलाकार?

आमिर खानपासून अक्षय कुमारपर्यंत; ९० च्या दशकात किती फी घेत होते हे कलाकार?

Payal Shekhar Naik HT Marathi

Aug 11, 2022, 05:08 PM IST

  • bollywood actors fees in 90's: चित्रपटांसोबतच अभिनेते त्यांच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठीही ओळखले जातात. बॉलिवूड कलाकार आता चित्रपटांसाठी भरमसाठ फी घेतात, मात्र हेच कलाकार ९० च्या दशकात किती मानधन घेत होते ठाऊक आहे का?

bollywood actors fees

bollywood actors fees in 90's: चित्रपटांसोबतच अभिनेते त्यांच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठीही ओळखले जातात. बॉलिवूड कलाकार आता चित्रपटांसाठी भरमसाठ फी घेतात, मात्र हेच कलाकार ९० च्या दशकात किती मानधन घेत होते ठाऊक आहे का?

  • bollywood actors fees in 90's: चित्रपटांसोबतच अभिनेते त्यांच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठीही ओळखले जातात. बॉलिवूड कलाकार आता चित्रपटांसाठी भरमसाठ फी घेतात, मात्र हेच कलाकार ९० च्या दशकात किती मानधन घेत होते ठाऊक आहे का?

akshay kuamr and aamir khan fees in 90's: बॉलिवूड कलाकार त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठीही ओळखले जातात. पूर्वीच्या काळी मोठ्या चित्रपटाचं जेवढं बजेट असायचं तेवढेच पैसे आता चित्रपटाच्या व्हीएफएक्सपासून कलाकारांच्या फीसाठी खर्च होतात. आणखी एक बाब म्हणजे आता चित्रपटांनी जास्त कमाई करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता कलाकारही चित्रपटासाठी भरमसाठ फी घेतात, पण हेच कलाकार ९० च्या दशकात फार कमी फी घेत होते.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

सलमान खान : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आज बॉलिवूडमध्ये 'दबंग' खान म्हटलं जातं. सलमानला बॉक्स ऑफिसचा 'सुलतान' ही म्हटलं जातं. चाहते सलमानच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. आजच्या काळात, सलमान चित्रपटांसाठी भरमसाठ फी घेतो आणि तो बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. ९० च्या दशकात सलमान एका चित्रपटासाठी २५ लाख रुपये मानधन घेत असे.

शाहरुख खान: शाहरुख खानचे चाहते सध्या खूप आनंदात आहेत, कारण एकीकडे त्याने चित्रपटांमध्ये कॅमिओ साकारण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे शाहरुखने २०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या एक-दोन नव्हे तर तीन चित्रपटांची घोषणा केली आहे. ९० च्या दशकात शाहरुखने आपल्या क्यूटनेस आणि रोमँटिक-थ्रिलर चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान त्यावेळी एका चित्रपटासाठी ३५ लाख रुपये घेत असे.

सुनील शेट्टी: बॉलिवूडच्या 'अण्णा'ने आपल्या करिअरमध्ये अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुनील शेट्टीने जबरदस्त अॅक्शन आणि लाऊड ​​डायलॉग्सने चाहत्यांची मनं जिंकली. सुनील आजही त्याच्या फिटनेसने सगळ्यांना तगडी टक्कर देतो. रिपोर्टनुसार, सुनील शेट्टी त्यावेळी एका चित्रपटासाठी २० लाख रुपये घेत होते.

आमिर खान : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला एकीकडे पसंती दिली जात असतानाच दुसरीकडे चित्रपटावर बहिष्कारही घातला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ९० च्या दशकात आमिर खान एका चित्रपटासाठी ५५ लाख रुपये घेत असे.

अक्षय कुमार: बॉलिवूडमध्ये दमदार अॅक्शन आणि कॉमेडीने सर्वांची मनं जिंकणारा अभिनेता अक्षय कुमार सध्या 'रक्षाबंधन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांची पसंती मिळत आहे. ९० च्या दशकात अक्षय एका चित्रपटासाठी ६० लाख रुपये घेत असे.

अजय देवगण: अजय देवगणने ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिले असले तरी त्याची विजयी कारकीर्द अजूनही सुरू आहे. अजय आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकतो. रिपोर्ट्सनुसार, अजय ९० च्या दशकात एका चित्रपटासाठी ६५ लाख रुपये घेत असे.

सनी देओल : सनी देओल आता राजकारणासोबतच चित्रपटांमध्येही सक्रिय आहे. सनी देओलची क्रेज आता पूर्वीसारखी राहिलेली नाही, पण ९० च्या दशकात सनीचा चाहत्यावर्ग वेगळा होता. रिपोर्ट्सनुसार, सनीने त्यावेळी 'बॉर्डर' या चित्रपटासाठी ९० लाख रुपये घेतले होते.

विभाग

पुढील बातम्या