मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Khal Nayak: ‘खलनायक’ रिलीज झाला अन् दोन महिन्यांनी संजय दत्तला अटक झाली; वाचा किस्सा...

Khal Nayak: ‘खलनायक’ रिलीज झाला अन् दोन महिन्यांनी संजय दत्तला अटक झाली; वाचा किस्सा...

Jun 16, 2023, 11:37 AM IST

  • 30 Years Of Khal Nayak: संजय दत्तच्या या चित्रपटासोबत जितक्या चांगल्या आठवणी आहेत, तितक्यातच वाईट आठवणी देखील आहेत.

Khal Nayak

30 Years Of Khal Nayak: संजय दत्तच्या या चित्रपटासोबत जितक्या चांगल्या आठवणी आहेत, तितक्यातच वाईट आठवणी देखील आहेत.

  • 30 Years Of Khal Nayak: संजय दत्तच्या या चित्रपटासोबत जितक्या चांगल्या आठवणी आहेत, तितक्यातच वाईट आठवणी देखील आहेत.

30 Years Of Khal Nayak: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या ‘खलनायक’ या चित्रपटाच्या रिलीजला आता ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संजय दत्त याने देखील एक पोस्ट शेअर करत या आठवणींना उजाळा दिला होता. संजय दत्तचा ‘खलनायक’ हा चित्रपट तुफान गाजला होता. मात्र, या चित्रपटाच्या रिलीजच्या अवघ्या २ महिन्यानंतर संजय दत्तला अटक करण्यात आली होती. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तचे नाव समोर आले होते. या प्रकरणात त्याला शिक्षा देखील भोगायला लागली होती.

ट्रेंडिंग न्यूज

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

संजय दत्तने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘खलनायक सारख्या प्रतिष्ठित चित्रपटाचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. मी सुभाष घईजी आणि मुक्ता आर्ट्सचाही खूप आभारी आहे, ज्यांनी असा चित्रपट बनवला आणि मला त्याचा एक भाग बनवले. सुभाष जी हे भारतीय चित्रपटांतील सर्वात मोठे दिग्दर्शक आहेत. राम आणि गंगा यांची भूमिका करणाऱ्या जॅकी दादा आणि माधुरी दीक्षित यांचेही हार्दिक अभिनंदन. याशिवाय चित्रपटातील सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्सचे खूप खूप अभिनंदन.’

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’चा झंझावात सुरूच! लवकरच गाठणार २५० कोटींचा टप्पा

संजय दत्तच्या या चित्रपटासोबत जितक्या चांगल्या आठवणी आहेत, तितक्यातच वाईट आठवणी देखील आहेत. ‘खलनायक’ चित्रपटाच्या रिलीजच्या अवघ्या दोन महिने आधी म्हणजेच १३ मार्च १९३३ रोजी मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात २५७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, यात ७१३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटांचा तपास सुरू झाला, तेव्हा दाऊद इब्राहिम, त्याचा भाऊ अनीस इब्राहिम, टायगर मेमन आणि अबू सालेम या गुंडांची नावे पुढे आली. मात्र, या तपासात अभिनेता संजय दत्तचे नाव देखील समोर होते.

या हल्ल्यात वापरली गेलेली स्फोटकं आणि बंदुका संजय दत्तच्या घरी ठेवण्यात आल्या होत्या. धोकादायक शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजयवर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला आधी ६ वर्षांची शिक्षा झाली होती, जी नंतर ५ वर्षांपर्यंत कमी करण्यात आली. १९ एप्रिल १९९३ रोजी संजय पहिल्यांदा तुरुंगात गेला होता. यानंतर १९९३ ते २०१६पर्यंत त्याने तुरुंगावास भोगला होता. २०१६मध्ये त्याने ५ वर्षांचा कारावास पूर्ण केला होता.

विभाग

पुढील बातम्या