मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड पंतप्रधान मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट; राहुल गांधींचा घणाघात

Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड पंतप्रधान मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट; राहुल गांधींचा घणाघात

Mar 15, 2024, 10:50 PM IST

  • Rahul Gandhi On Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालवलेले जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट असल्याचा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. 

राहुल गांधी पत्रकार परिषदेत बोलताना

Rahul Gandhi On Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालवलेले जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट असल्याचा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

  • Rahul Gandhi On Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालवलेले जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट असल्याचा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इलेक्टोरल बॉन्डवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी याला जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट संबोधले आहे. काही दिवसापूर्वीच इलेक्टोरल बॉन्डचे सत्य समोर आले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी ईडी आणि सीबीआयच्या कार्यप्रणालीवरही टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, सीबीआय आणि ईडी तपास करत नाहीत तर खंडणी वसुली करतात. भारत जोडो यात्रेदरम्यान भिवंडी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

ट्रेंडिंग न्यूज

Lok sabha Election 5 phase voting live : रायबरेली, अमेठीसह ४९ जागांवर आज मतदान, पाचव्या टप्प्यात 'या' दिग्गजांचा समावेश

Priyanka Gandhi interview: 'देशभरात भाजपविरोधात लाट; मोदींनी कॉंग्रेसचा जाहीरनामा वाचून बोलावेः प्रियांका गांधी

VIDEO : राहुल गांधी व अखिलेश यांच्या सभेत गोंधळ, कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडले, दोन्ही नेते भाषण न देताच माघारी

Cong manifesto fake Post: काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत चुकीची माहिती पसरवली, गोव्यातील एका व्यक्तीला अटक

राहुल गांधी म्हणाले की, भारताच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे. निवडणूक रोखे देशातील मोठ्या कंपन्यांकडून पैसे उकळण्याचे हे एक साधन आहे. ही योजना म्हणजे जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट असून ईडी-सीबीआय वसुलीचे काम करतात. या पैशांचा वापर भाजप दुसरे पक्ष फोडण्यासाठी करतो, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली. 

देशातील ज्या कंपन्यांवर ईडी सीबीआय सारख्या तपास यंत्रणांनी कारवाई केली, त्यांनीच भाजपला देणगी दिली आहे. सीबीआय, ईडी, आयटी ही भाजप आणि आरएसएसची शस्त्रे आहेत. या आता भारताच्या तपास यंत्रणा राहिल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालय याची चौकशी करेल, अशी अपेक्षा असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 

भाजपने सुरू केलेल्या इलेक्टोरल बाँड्सची माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यानंतरच हे रॅकेट समोर आले आहे. देशातील बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी भाजपला हजारो कोटी रुपये दिल्याची आकडेवारी समोर आली. हे देशविरोधी कृत्य आहे. यापेक्षा मोठे देशविरोधी कृत्य असू शकत नाही. भाजप सरकार ईडी, सीबीआय, आयटीवर दबाव टाकून अनेक कंपन्यांकडून पैसे उकळते. ज्या कंपन्यांवर तपास यंत्रणांनी कारवाई केली जाते, त्या कंपन्या भाजपला देणगी देतात. ही पंतप्रधान मोदींची आयडिया आहे. हे नितीन गडकरींनी केलेले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, टनेलचे कंत्राट काही कंपन्यांना दिले. त्यांच्याकडून मोठी रक्कम इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून वसुली केली आहे. हा राष्ट्रद्रोह आहे. या घोटाळ्यात नितीन गडकरींचा सहभाग नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच हात आहे.

राहुल गांधी म्हणाले सीबीआय-ईडी आता भाजपचे शस्त्र असून त्यांच्या नियंत्रणात काम करत आहे. निवडणूक आयोग, सीबीआई-ईडी आता भाजप व आरएसएसचे शस्त्र झाले आहेत. त्यांनी विचार करावा की एक दिवस भाजपचे सरकार बदलणार आहे. त्यानंतर कारवाई होईल. त्यांच्यावर अशी कारवाई होईल की, मी गँरेंटी देतो पुन्हा असा प्रकार होणार नाही.

पुढील बातम्या