मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Pak Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामना राखीव दिवशी होणार, पावसामुळे आजचा खेळ रद्द
Ind vs Pak Asia Cup 2023 Live

Ind vs Pak Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामना राखीव दिवशी होणार, पावसामुळे आजचा खेळ रद्द

Sep 10, 2023, 03:56 PMIST

India vs Pakistan super 4 Live Cricket Score Today match : आशिया कप 2023 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. सुपर 4 मधील हा तिसरा सामना आहे. या महामुकाबल्यावर पावसाचे सावट आहे, मात्र, केवळ या सामन्यासाठी उद्याचा राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.

Sep 10, 2023, 08:49 PMIST

भारत-पाकिस्तान सामना राखीव दिवशी होणार

कोलंबोमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. परिस्थिती पाहता आज सामना होणे शक्य नाही. पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता राखीव दिवशी म्हणजेच उद्या होणार आहे. भारताचा डाव आता ११ सप्टेंबरला (सोमवार) पुढे सुरू होईल. भारताने आज २४.१ षटके फलंदाजी केली. आता येथूनच उद्या भारताची फलंदाजी सुरू होईल.

Sep 10, 2023, 05:40 PMIST

पाकिस्तानला हे लक्ष्य मिळू शकते

सामना अधिकारी आजच सामना संपवण्याचा प्रयत्न करतील. आज अजिबात सामना होऊ शकला नाही, तर उद्यान राखीव दिवशी सामना सुरू होईल. आज जर डकवर्थ लुईस नियम आला आणि भारतीय संघ पुन्हा फलंदाजी करू शकला नाही, तर पाकिस्तानला लक्ष्य दिले जाईल. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला २० षटकांत १८१ धावा, २१ षटकांत १८७ धावा, २२ षटकांत १९४ धावा, २३ षटकांत २०० धावा आणि २४ षटकांत २०६ धावांचे लक्ष्य मिळेल.

Sep 10, 2023, 05:03 PMIST

मुसळधार पावसामुळे सामना थांबवावा लागला

मुसळधार पावसामुळे सामना थांबवावा लागला. सामना थांबला तोपर्यंत टीम इंडियाने २४.१ षटकात २ गडी गमावून १४७ धावा केल्या होत्या. सध्या केएल राहुल २८ चेंडूत १७ धावा आणि विराट कोहली १६ चेंडूत ८ धावांवर फलंदाजी करत होते. तिसर्‍या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत ३८ चेंडूत २४ धावांची भागीदारी झाली आहे. या सामन्यासाठी उद्याचा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. आज सामना सुरू झाला नाही, तर भारतीय संघ उद्या २४.१ षटकांपासूनच फलंदाजीला सुरुवात करेल.

Sep 10, 2023, 04:52 PMIST

भारताच्या १४० धावा

२३ षटकांनंतर भारताने २ गडी गमावून १४० धावा केल्या आहेत. सध्या केएल राहुल २४ चेंडूत १३ धावा आणि विराट कोहली १३ चेंडूत ६ धावांवर फलंदाजी करत आहे.

Sep 10, 2023, 04:29 PMIST

शुभमन गिलही बाद

रोहित शर्मानंतर शुभमन गिलही बाद झाला आहे. शाहीन आफ्रिदीने त्याला आगा सलमानकरवी झेलबाद केले. गिलने ५२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. आता विराट कोहलीसोबत लोकेश राहुल क्रीजवर आहे. १८ षटकांनंतर भारताची धावसंख्या १२४/२ आहे.

Sep 10, 2023, 04:23 PMIST

रोहित शर्मा बाद

१२१ धावांवर भारतीय संघाची पहिली विकेट पडली. कर्णधार रोहित शर्मा ४९ चेंडूत ५६ धावा करून बाद झाला. शादाब खानने त्याला फहीम अश्रफकडे झेलबाद केले.

Sep 10, 2023, 04:10 PMIST

रोहितचेही अर्धशतक 

भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. रोहितने ४२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि चार षटकार मारले. भारताची धावसंख्या १४.२ षटकात बिनबाद ११३ धावा.

Sep 10, 2023, 04:05 PMIST

शुभमन गिलचे अर्धशतक

शुभमन गिलने ३७ चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. १३ षटकांनंतर भारताची धावसंख्या एकही विकेट न गमावता ९६ धावा आहे. शुभमन ३७ चेंडूत ५० आणि कर्णधार रोहित शर्मा ४१ चेंडूत ४४ धावांवर फलंदाजी करत आहे. रोहितने १३व्या षटकात शादाबच्या शेवटच्या तीन चेंडूंवर दोन षटकार आणि एक चौकार लगावला. शादाबच्या १३व्या षटकात १९ धावा आल्या.

Sep 10, 2023, 04:07 PMIST

शुभमन-रोहितची उत्कृष्ट फलंदाजी

११ षटकांनंतर भारताने एकही विकेट न गमावता ६९ धावा केल्या आहेत. शुभमन अर्धशतकाच्या जवळ आहे. तो ३४ चेंडूत ४७ धावा करत असून रोहित शर्मा ३२ चेंडूत २० धावा करत आहे.

Sep 10, 2023, 03:41 PMIST

 ९ षटकात ५३ धावा

९ षटकानंतर भारताच्या ५३ धावा झाल्या आहेत. रोहित २४ चेंडूत १० तर शुभमन ३० चेंडूत ४१ धावांवर खेळत आहेत.

Sep 10, 2023, 03:20 PMIST

भारताने ३ षटकात २३ धावा केल्या

भारताने पाकिस्तानविरुद्ध तुफानी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने ३ षटकात २३ धावा केल्या आहेत. शाहीनच्या पहिल्याच षटकात रोहितने षटकार ठोकला होता. यानंतर शाहीन पुन्हा तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आला. या षटकात शुभमनने त्याला तीन चौकार मारले.

Sep 10, 2023, 03:03 PMIST

भारताची फलंदाजी सुरू

भारताने पाकिस्तानविरुद्ध फलंदाजीला सुरुवात केली, रोहित आणि गिल क्रीजवर आहेत. शाहीन शाह आफ्रिदी पहिले षटक टाकत आहे.

Sep 10, 2023, 02:55 PMIST

मोहम्मद शमीला संघात नाही

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केएल राहुल आणि बुमराह परतले. श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळालेले नाही. श्रेयस अनफिट झाला आहे. मोहम्मद शमीला संघात स्थान मिळालेले नाही.

Sep 10, 2023, 02:37 PMIST

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान: फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

Sep 10, 2023, 02:35 PMIST

बाबरने टॉस जिंकला, भारताची प्रथम फलंदाजी

बाबर आझमने नाणेफेक जिंकली, पाकिस्तानने भारताविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुलचा समावेश करण्यात आला आहे.

Sep 10, 2023, 02:21 PMIST

थोड्याच वेळात टॉस, केएल राहुल खेळणार

भारत-पाकिस्तान सामन्यात लवकरच नाणेफेक होणार आहे. या सामन्यात बुमराहचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. या सामन्यात केएल राहुलही खेळण्याची शक्यता आहे. सामन्यापूर्वी तो मैदानावर सराव करताना दिसला. राहुलने विकेटकीपिंग ग्लोव्हज घातले होते.

Sep 10, 2023, 02:14 PMIST

शमी की शार्दुल? बुमराह कोणाच्या जागी खेळणार?

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बुमराहच्या जागी कोणाची वर्णी लागणार हा प्रश्न कायम आहे. नेपाळविरुद्धच्या सामन्यात बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी खेळला. अशा स्थितीत शमी बाहेर बसण्याची शक्यता आहे. शार्दुल खेळणार की नाही हा प्रश्नही कायम आहे. याशिवाय पाकिस्तानविरुद्ध ८२ धावांची खेळी करणारा इशान किशन खेळणार हे निश्चित नसले तरी त्याच्या कामगिरीमुळे त्याला बसवणे कठीण आहे. केएल राहुलही परतला आहे.

Sep 10, 2023, 01:40 PMIST

हवामान स्वच्छ, सामना वेळेवर सुरू होणार

कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. यापूर्वी आशिया कप 2023 मधील भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र रविवारी हवामान स्वच्छ आहे. त्यामुळे सामना वेळेवर सुरू होईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्टेडियमचा फोटो शेअर करून हवामान अपडेट दिले आहे. 

Sep 10, 2023, 01:22 PMIST

केएल राहुल विकेटकिपिंग करण्यासही तयार

बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल म्हणाला, रिहॅब प्रक्रियेदरम्यान, त्याला एक छोटीशी समस्या आली होती, ज्यामुळे तो सुरुवातीचे दोन सामने खेळला नाही. IPL 2023 मध्ये राहुलला मांडीला दुखापत झाली होती आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती, ज्यामुळे तो अनेक महिने मैदानाबाहेर राहिला होता. १ मे २०२३ रोजी आरसीबी विरुद्धच्या सामन्यात तो जखमी झाला होता.

यादरम्यान केएल राहुल म्हणाला की, तो या सामन्यात विकेटकिपिंग करण्यासही तयार आहे. राहुलने सांगितले की, सामन्यातील ५० षटके यष्टिरक्षणाची तयारी झाली आहे. राहुलने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, येत्या १० दिवसांत तो दर्जेदार संघांविरुद्ध खेळणार आहे, त्यामुळे मी याबद्दल खूप उत्सुक आहे. मी तयारी केली आहे.

Sep 10, 2023, 01:20 PMIST

केएल राहुल खेळणार हे नक्की! BCCI ने व्हिडिओ शेअर केला 

केएल राहुलने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खुलासा केला आहे की 2023 च्या आशिया चषकापूर्वी तो पुनरागमन करू शकतो. बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये केएल राहुलने ही माहिती दिली आहे. आज भारत पाकिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. अशा परिस्थितीत केएल राहुलला या सामन्यात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

Sep 10, 2023, 12:14 PMIST

केएल राहुलची कामगिरी

२०१९ पासून राहुलची कामगिरी चांगली आहे. त्याने २०१९ मध्ये १३ सामन्यांमध्ये ४७.६७ च्या सरासरीने ५७२ धावा केल्या. २०२० मध्ये त्याने ९ सामन्यांमध्ये ५५.३८ च्या सरासरीने ४४३ धावा केल्या, २०२१ मध्ये त्याने तीन सामन्यात ८८.५० च्या सरासरीने १०८ धावा केल्या, २०२२ मध्ये त्याने १० सामन्यात २७.८९ च्या सरासरीने २५१ धावा केल्या आणि २०२३ मध्ये त्याने ६ सामन्यांत ५६.५० च्या सरासरीने २२६ धावा केल्या.

Sep 10, 2023, 11:31 AMIST

रोहित शर्मा विक्रम करणार

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानावर उतरताच रोहित एकदिवसीय आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा संयुक्तरित्या दुसरा खेळाडू बनेल.

Sep 10, 2023, 11:15 AMIST

अश्विनने दिले हवामान अपडेट

भारत पाकिस्तान सामन्यासाठी कोलंबोतील वातावरण आल्हाददायक आहे, आर अश्विनही या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आला आहे. त्याने कोलंबोचा एक फोटो शेअर केला आहे.

Sep 10, 2023, 11:04 AMIST

भारताची गोलंदाजी मजबूत

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही संघात समावेश झाला असून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी संघाची गोलंदाजीही मजबूत झाली आहे. ग्रुप सामन्यात बुमराहचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र पावसामुळे संघाने गोलंदाजी केली नाही. आजच्या सामन्यात बुमराह, सिराज आणि शार्दुल खेळू शकतात. शार्दुलने सराव सत्रात गोलंदाजीसोबतच फलंदाजीचा सरावही केला.

Sep 10, 2023, 10:43 AMIST

राहुल की इशान किशन? पाचव्या क्रमांकावर कोण खेळणार

केएल राहुल आणि इशान किशन यांच्यात निवड करणे हे टीम मॅनेजमेंटसमोर आव्हान आहे. गेल्या महिनाभरात इशानने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. तर पाचव्या क्रमांकावर राहुलचे आकडे शानदार आहेत. इशानने त्याच्या वनडे कारकिर्दीत फक्त एकदाच पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याच वेळी, राहुलने वनडेमध्ये पाचव्या क्रमांकावर १८ डाव खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ५३ च्या सरासरीने ७४२ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे.

Sep 10, 2023, 10:33 AMIST

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ.

Sep 10, 2023, 12:14 PMIST

बाबरने एक दिवसआधीच प्लेइंग इलेव्हन जाहीर केली

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सामन्याच्या एक दिवसआधीच प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती. त्याने संघात एक मोठा बदल केला आहे. फिरकी ऑलराऊंडर मोहम्मद नवाजऐवजी वेगवान गोलंदाज ऑलराऊंडर फहीम अश्रफचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.

Sep 10, 2023, 12:14 PMIST

दोन्ही संघामध्ये चुरशीचा सामना रंगणार

कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर फोरचा सामना रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. मात्र, त्यासाठी उद्याचा राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. पाऊस न पडल्यास दोन्ही संघांमध्ये चुरशीची सामना होऊ शकतो. 

    शेअर करा