मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND Vs PAK Asia Cup 2023 : कुलदीपच्या फिरकीत पाकिस्तान अडकला, सुपर 4 सामन्यात भारताचा मोठा विजय
IND Vs PAK Asia Cup 2023 (BCCI Twitter)

IND Vs PAK Asia Cup 2023 : कुलदीपच्या फिरकीत पाकिस्तान अडकला, सुपर 4 सामन्यात भारताचा मोठा विजय

Sep 11, 2023, 04:16 PMIST

Cricket Score India vs Pakistan Asia Cup 2023 : भारताने सुपर 4 सामन्यात पाकिस्तानचा २२९ धावांनी पराभव केला आहे. भारताच्या ३५७ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १२८ धावाच करू शकला.

Sep 11, 2023, 11:00 PMIST

पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव

भारताने पाकिस्तानवर २२८ धावांनी विजय मिळवला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ३२ षटकांत ८ बाद १२८ धावाच करु शकला. पाकिस्तानचे शेवटचे दोन फलंदाज नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजीला आले नाहीत. भारताकडून कुलदीप यादवने २५ धावांत ५ बळी घेतले.

Sep 11, 2023, 10:56 PMIST

पाकिस्तानची सातवी विकेट

पाकिस्तानची सातवी विकेट पडली आहे. कुलदीप यादवने इफ्तिखार अहमदला झेलबाद केले. इफ्तिखारने ३५ चेंडूत २३ धावा केल्या, ज्यात एक चौकार समाविष्ट होता. ३० षटकं संपल्यानंतर पाकिस्तानची धावसंख्या ७ गड्यांच्या मोबदल्यात ११९ धावा आहे.

Sep 11, 2023, 10:43 PMIST

पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत

कुलदीप यादवला तिसरे यश मिळाले आहे. कुलदीपने शादब खानला शार्दुल ठाकूरकरवी झेलबाद केले. शादाबला १० चेंडूत ६ धावा करता आल्या. पाकिस्तानची धावसंख्या २७.४ षटकात ६ बाद ११० धावा आहे. पाकिस्तान पूर्ण ५० षटके खेळू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Sep 11, 2023, 10:57 PMIST

पाकिस्तानी संघाला चौथा धक्का

पाकिस्तानी संघाला चौथा धक्का बसला आहे. फखर जमानला कुलदीप यादनने बोल्ड केले. फखर जमानने ५० चेंडूत २७ धावा केल्या. पाकिस्तानची धावसंख्या १९.२ षटकात चार विकेट गमावत ७७ धावा आहे. आता सलमान आगा आणि इफ्तिकार अहमद क्रीजवर आहेत.

Sep 11, 2023, 09:59 PMIST

पाकिस्तानची धावसंख्या तीन बाद ६५ धावा

पाकिस्तानची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ५० धावांच्या पुढे गेली आहे. आगा सलमान आणि फखर जमान क्रीजवर आहेत. हे दोघेही मोठी भागीदारी करून आपल्या संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न करतील. १५ षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ६५ धावा आहे.

Sep 11, 2023, 09:27 PMIST

पाकिस्तानची तिसरी विकेट पडली

४७ धावांवर पाकिस्तानची तिसरी विकेट पडली. मोहम्मद रिझवान ५ चेंडूत २ धावा करून बाद झाला. शार्दुल ठाकूरने त्याला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. आता फखर जमानसोबत आगा सलमान क्रिजवर आहे. १२ षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या ४७/३ आहे.

Sep 11, 2023, 09:15 PMIST

सामना ९.२० वाजता सुरू होईल

नवीनतम अपडेटनुसार सामना ९.२० वाजता सुरू होईल. यापुढे पाऊस न पडल्यास पाकिस्तानला सामन्यात पूर्ण ५० षटके खेळण्याची संधी मिळेल.

Sep 11, 2023, 08:32 PMIST

पावसामुळे खेळ थांबला

पावसामुळे खेळ थांबला आहे. २५७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने ११ षटकात २ गडी गमावून ४४ धावा केल्या आहेत. बाबर आझम आणि इमाम उल हक बाद झाले आहेत. फखर जमान आणि मोहम्मद रिझवान क्रीजवर आहेत. भारतासाठी वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. बुमराह आणि हार्दिकने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.

Sep 11, 2023, 08:09 PMIST

बाबर आझम बाद

४३ धावांवर पाकिस्तानची दुसरी विकेट पडली. बाबर आझम २४ चेंडूत १० धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्याने त्याला क्लीन बोल्ड केले.

Sep 11, 2023, 08:01 PMIST

१० षटकात पाकच्या ४३ धावा

१० षटकानंतर पाकिस्तानच्या १ बाद ४३ धावा झाल्या आहेत. बाबर आझम १४ तर फखर जमान १० धावांवर खेळत आहेत.

Sep 11, 2023, 07:36 PMIST

पाकिस्तानची पहिली विकेट पडली

३५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. १७ धावांवर संघाची पहिली विकेट पडली. जसप्रीत बुमराहने इमाम उल हकला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. इमामने १८ चेंडूत ९ धावा केल्या. आता बाबर आझम फखर जमानसोबत क्रीजवर आहे.

Sep 11, 2023, 07:22 PMIST

पाकिस्तानची फलंदाजी सुरू

३५७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची फलंदाजी सुरू झाली आहे. फखर जमान आणि इमाम उल हक क्रीजवर आहेत. जसप्रीत बुमराहने भारताकडून गोलंदाजीची सुरुवात केली आहे. सिराज दुसऱ्या टोकाला नवा चेंडू हाताळत आहे.

Sep 11, 2023, 06:44 PMIST

पाकिस्तानसमोर ३५७ धावांचे लक्ष्य

भारताने पाकिस्तानसमोर ३५७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित ५० षटकात २ गडी गमावून ३५६ धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक १२२ आणि लोकेश राहुलने १११ धावा केल्या. दोन्ही फलंदाज शतके झळकावून नाबाद राहिले. या दोघांपूर्वी रोहित शर्मा ५६ धावा करून बाद झाला तर शुभमन गिल ५८ धावा करून बाद झाला.

Sep 11, 2023, 06:32 PMIST

कोहलीचं शतक

विराट कोहलीने ८४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. हे त्याचे वनडेतील ४७वे शतक आहे. आपल्या खेळीत त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले. त्याने राहुलसोबत २०० धावांची भागीदारीही पूर्ण केली आणि भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. ४८ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३३०/२ आहे.

Sep 11, 2023, 06:25 PMIST

केएल राहुलचं शतक

लोकेश राहुलने १०० चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने पुनरागमन करत दमदार खेळी केली. राहुलने आतापर्यंत १० चौकार आणि २ षटकार मारले आहेत. हे त्याचे वनडेतील सहावे शतक आहे.

Sep 11, 2023, 05:53 PMIST

भारताची धावसंख्या २५० पार

भारताने दोन विकेट गमावून २५० धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि लोकेश राहुल आता वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन्ही फलंदाजांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली असून आता झटपट धावा करून शतक झळकावण्याचा प्रयत्न करतील. 

Sep 11, 2023, 05:52 PMIST

विराटचे अर्धशतक

विराट कोहलीने ५५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने आतापर्यंतच्या खेळीत चार चौकार मारले आहेत. हे त्याचे वनडेतील ६६वे अर्धशतक आहे. त्याने लोकेश राहुलसोबत उत्कृष्ट शतकी भागीदारी केली आणि टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येकडे नेत आहे.

Sep 11, 2023, 05:39 PMIST

राहुल आणि कोहली यांच्यात शतकी भागीदारी

लोकेश राहुल आणि विराट कोहली यांच्यात शतकी भागीदारी झाली आहे. राहुल आक्रमक फलंदाजी करत आहे आणि विराट एका टोकाला सावध खेळत आहे. राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले असून विराटही अर्धशतकाच्या जवळ आहे. ३६ षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात २२८ धावा आहे.

Sep 11, 2023, 05:23 PMIST

केएल राहुलचे अर्धशतक

केएल राहुलने दुखापतीतून सावरल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. राहुलने आपले अर्धशतक ६० चेंडूत पूर्ण केले. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. भारताची धावसंख्या ३३.३ षटकात २ बाद २०९ धावा झाली आहे.

Sep 11, 2023, 05:20 PMIST

भारत २०० धावांच्या पुढे

भारताची धावसंख्या दोन गडी गमावून २०० धावांच्या पुढे गेली आहे. विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी शानदार भागीदारी करून टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणले आहे. आता या दोघांचाही वेगवान धावा करून भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल.

Sep 11, 2023, 05:03 PMIST

कोहलीच्या या वर्षात १ हजार धावा पूर्ण

कोहलीने एक विशेष कामगिरी केली आहे. या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. भारताची धावसंख्या २८.२ षटकात २ बाद २६५ धावा आहे.

Sep 11, 2023, 04:44 PMIST

सामना सुरू

भारत आणि पाकिस्तान सामना सुरू झाला आहे. खेळ २४.१ षटकांच्या पुढे खेळ सुरू आहे. शादाब त्याचे षटक पूर्ण करत आहे. तर, विराट कोहली आणि केएल राहुल क्रीजवर आहेत.

Sep 11, 2023, 04:36 PMIST

हारिस रौफच्या जागी अष्टपैलू खेळाडूला गोलंदाजी करावी लागेल

हारिस रौफच्या जागी इफ्तिखार अहमद किंवा इतर कोणत्याही अष्टपैलू खेळाडूला गोलंदाजी करावी लागेल आणि याचा फायदा भारतीय फलंदाज घेऊ शकतात. रौफ पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि तो खेळल्यास त्याची दुखापत आणखी वाढू शकते. पाकिस्तानी संघ व्यवस्थापन विश्वचषकापूर्वी रौफलाची दुखापत वाढवू इच्छित नाही. यामुळे तो आज गोलंदाजी करणार नाही.

Sep 11, 2023, 04:30 PMIST

हारिस रौफ गोलंदाजी करू शकणार नाही

पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. हारिस रौफ दुखापतीमुळे या सामन्यात पुढे गोलंदाजी करू शकणार नाही.

Sep 11, 2023, 04:35 PMIST

सामना ४.४० वाजता सुरू होईल

नवीन अपडेटनुसार सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.४० वाजता सुरू होईल. भारत २४.१ षटकांपासून खेळण्यास सुरुवात करेल. षटकांमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. जर पाऊस पडला नाही तर दोन्ही संघांना ५०-५० षटके खेळण्याची संधी मिळेल.

Sep 11, 2023, 04:24 PMIST

पंचांनी केली मैदानाची पाहणी, लवकरच खेळ सुरू होईल

सायंकाळी ४.२० वाजता पंचांनी मैदानाची पाहणी केली. मैदान कोरडे दिसत आहे आणि लवकरच खेळ सुरू होऊ शकेल. मैदानात फक्त दोनच भाग आहेत जिथे थोडा ओलावा आहे. खेळपट्टीच्या काठावर आणि मिड-विकेट भागात मैदान ओले आहे.

Sep 11, 2023, 04:16 PMIST

रिमझिम पाऊस थांबला

रिमझिम पाऊस थांबला आहे. कव्हर काढले जात आहेत. अंपायर मैदानात पाहणी करत आहेत. मैदाना एकदम कोरडे दिसत दिसते. रवींद्र जडेजा, सिराज आणि बाबर आझमही बाहेर आले आहेत. राहुल द्रविड खेळपट्टीचा आढावा घेत आहे.

Sep 11, 2023, 03:49 PMIST

मैदानात अजूनही झाकलेले

राखीव दिवशी नियोजित वेळेत खेळ सुरू होऊ शकला नाही. कोलंबोचे आर. प्रेमदासा स्टेडियमवर अधूनमधून पाऊस पडत आहे. पाऊस थांबल्यानंतर कव्हर मैदानातून काढले जात आहेत. मग पाऊस आला की मैदाना झाकण्याचे काम होत आहे. सध्या मैदानावर कव्हर्स आहेत. पाकिस्तानी खेळाडू हरिस रौफ आणि मोहम्मद नवाज कव्हरची संख्या मोजण्यात व्यस्त आहेत.

Sep 11, 2023, 02:57 PMIST

मैदानावरील कव्हर्स काढण्यास सुरुवात

कोलंबोत पाऊस थांबल्यासारखा वाटतोय. ग्राऊंडस्टाफने कव्हर्स काढण्यास सुरुवात केली आहे. कालपासून आजपर्यंत कोलंबोमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अशा स्थितीत मैदानाला खेळण्याच्या स्थितीत आणणे सोपे जाणार नाही. सामना उशिरा सुरू होणार आहे. यापूर्वी हा सामना ३ वाजता सुरू होणार होता.

Sep 11, 2023, 02:37 PMIST

कोलंबोमध्ये पाऊस सुरूच

क्रिकेट चाहत्यांसाठी कोणतीही चांगली बातमी नाही. कोलंबोमध्ये पाऊस सुरूच आहे. राखीव दिवशी खेळ पुढे जाईल की नाही हे सांगणे कठीण आहे. मैदान पूर्णपणे झाकलेले आहे. सामना वेळेवर सुरू होण्याची शक्यता कमी आहे.

Sep 11, 2023, 02:22 PMIST

कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस सुरू

कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे. आजही भारत-पाकिस्तान यांच्यातील खेळावर संकट ओढवले आहे. सामना वाहून गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. राखीव दिवस ठेऊन काही फायदा होणार नाही. अशा स्थितीत भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा अनिर्णित राहण्याचा धोका आहे. ग्रुप स्टेजमध्ये हे दोन संघ आमनेसामने आले होते तेव्हाही तो सामना पावसामुळे वाहून गेला होता.

Sep 11, 2023, 01:04 PMIST

वनडेत १३ हजार धावा करणारे खेळाडू

विराट कोहलीला वनडेत १३ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ९० धावांची गरज आहे. विराट कोहलीच्या आधी सचिन तेंडुलकर (भारत), कुमार संगकारा (श्रीलंका), रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया), सनथ जयसूर्या (श्रीलंका) यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

Sep 11, 2023, 12:39 PMIST

विराट कोहलीला १३ हजार धावा पूर्ण करण्याची संधी

विराट कोहलीने आतापर्यंत २७८ एकदिवसीय सामन्यांच्या १२९१० धावा केल्या आहेत. १३ हजार धावा पूर्ण करण्यासाठी तो फक्त ९० धावा दूर आहे. जर आज सामना झाला तर विराटला हा टप्पा गाठण्याची संधी असेल. १३ हजार धावा करणारा विराट भारताचा दुसरा आणि जगातील पाचवा फलंदाज ठरेल.

Sep 11, 2023, 12:23 PMIST

भारत सलग तीन दिवस सामने खेळणार

सोमवारी पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळल्यानंतर भारतीय संघाला मंगळवारी, १२ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धही सामना खेळायचा आहे. हा सामनाही ५०-५० षटकांचा असेल. अशा स्थितीत टीम इंडिया सलग तीन दिवस अॅक्शनमध्ये दिसणार आहे, जी वर्ल्ड कपपूर्वी भारतीय खेळाडूंसाठी अडचणीची ठरू शकते.

Sep 11, 2023, 11:54 AMIST

वसीम अक्रम काय म्हणाला?

रात्री अधूनमधून पाऊस पडत राहिल्याचे अक्रमने सांगितले. वसीम अक्रम व्हिडिओमध्ये म्हणाला की, “कोलंबोमधून अपडेट, रात्रभर अधूनमधून पाऊस पडत आहे, पण सध्या काहीच स्पष्ट नाही, पण तुम्ही ढग पाहू शकता आणि वारा आहे. सध्या ठीक आहे, पण सामना सुरू होईपर्यंत काय होते ते पाहू. मला माहित आहे की हे प्रत्येकासाठी निराशाजनक आहे, परंतु आपण हवामान नियंत्रित करू शकत नाही. मला आशा आहे की हवामान चांगले होईल, मला आशा आहे की तुम्ही चांगल्या क्रिकेटचा आनंद घ्याल.

Sep 11, 2023, 11:35 AMIST

वसीम अक्रमने दिले हवामान अपडेट

Sep 11, 2023, 11:23 AMIST

कोलंबोत आज पावसाची शक्यता ९९ टक्के 

 भारत-पाकिस्तान सामना राखीव दिवशीही पूर्ण होईल की नाही, याबाबत सस्पेंस आहे. Accuweather नुसार, आज (सोमवारी) कोलंबोमध्ये पावसाची शक्यता ९९ टक्के आहे.

Sep 11, 2023, 11:14 AMIST

कोलंबोत आजही जोरदार पावसाचा अंदाज

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत पावसाची शक्यता कमी आहे. मात्र त्यानंतर मुसळधार पाऊस पडू शकतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ३ वाजता सुरू होईल. टीम इंडिया आपल्या मागील स्कोअरपासून खेळण्यास सुरुवात करेल.

Sep 11, 2023, 10:55 AMIST

पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान सामना राखीव दिवशी होणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे सामना दोन दिवस चालण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर पाकिस्ताने याआधी ३१ वर्षांपूर्वी राखीव दिवशी सामना खेळला होता. त्यावेळी १९९२ मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड सामना राखीव दिवशी गेला होता. तर भारताने ४ वर्षांपूर्वी दोन दिवस वनडे सामना खेळला होता. त्या सामन्या भारताचा न्यूझीलंडकडून वर्ल्डकप २०१९ सेमी फायनलमध्ये पराभव झाला होता. 

Sep 11, 2023, 02:58 PMIST

२४.१ षटकापासून सुरू होणार सामना

भारत आणि पाकिस्तान सामना काल जिथे थांबला तिथूनच आज सुरू होईल. भारताने रविवारी २४.१ षटकात २ बाद १४७ धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि केएल राहुल नाबाद आहेत. हे दोघे आज भारतीय डावाची सुरुवात करतील. रोहितने ५६ आणि शुभमनने ५८ धावा केल्या. शाहीन आणि शादाबला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

    शेअर करा