मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  sachin tendulkar birthday : मैदान सोडून १० वर्षे झाली तरी करोडो रुपये कमावतोय सचिन तेंडुलकर?; किती आहे एकूण संपत्ती?

sachin tendulkar birthday : मैदान सोडून १० वर्षे झाली तरी करोडो रुपये कमावतोय सचिन तेंडुलकर?; किती आहे एकूण संपत्ती?

Apr 24, 2024, 11:05 AMIST

Sachin Tendulkar Net Worth : 'क्रिकेटचा देव' अशी स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या सचिन तेंडुलकर याचा आज वाढदिवस. क्रिकेटचं मैदान सोडून १० वर्षे झाल्यानंतरही सचिनची क्रेझ आणि ब्रँड व्हॅल्यू कायम आहे. आज वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊया त्याचं निवृत्तीनंतरचं उत्पन्न आणि एकूण संपत्ती

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याची संपत्ती भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीपेक्षा जास्त आहे. सचिनची एकूण संपत्ती १४०० कोटींवर असल्याचं बोललं जातं. जाहिराती, सोशल मीडिया व अन्य मार्गानं सचिन रोजच्या रोज पैसे कमावत असतो. अनेक कंपन्यांचा तो ब्रँड अ‍ॅम्बेसेडरही आहे.
(1 / 6)

एका वेबसाइटच्या माहितीनुसार, सचिनचं महिन्याचं उत्पन्न ४ कोटींहून अधिक आहे, तर त्याचं वार्षिक उत्पन्न ५५ कोटींहून अधिक आहे. सचिन अपोलो टायर्स, आयटीसी सॅव्हलॉन, जिओ सिनेमा, स्पिनी आणि एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्स सारख्या नामांकित कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये झळकताना दिसतो. त्यातून त्याला मोठं उत्पन्न मिळतं.
(2 / 6)

२०१९ मध्ये सचिन तेंडुलकरची ब्रँड व्हॅल्यू १५.८ टक्क्यांनी वाढली. डफ आणि फेल्प्सच्या २०१९ च्या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव निवृत्त सेलिब्रिटी ठरला. २०२० मध्ये सचिनची एकूण संपत्ती ८३४ कोटी रुपये होती. २०२१ मध्ये ती १०८० कोटींवर गेली आणि आता १,४०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
(3 / 6)

बीएमडब्ल्यूसह बड्या नामांकित कंपन्यांच्या जाहिरातीतून सचिन तेंडुलकरला २० ते २२ कोटी रुपयांची कमाई होते. २०१६ मध्ये त्यांनी वस्त्रोद्योगातही प्रवेश केला. ट्रू ब्लू ब्रँडच्या माध्यमातून कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या लिटिल मास्टरनं २०१९ मध्ये अमेरिका आणि ब्रिटनमध्येही ट्रू ब्लूचा विस्तार केला होता.
(4 / 6)

सचिनने फूड इंडस्ट्रीतही पाऊल ठेवले आहे. मुंबई, बेंगळुरूसह प्रमुख शहरांमध्ये त्यांची रेस्टॉरंट्स आहेत. मनोरंजन आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्येही त्यानं मोठी गुंतवणूक केली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात सचिनचा आलिशान बंगला आहे. त्याची अंदाजित किंमत १०० कोटी रुपये आहे. २००० मध्ये त्यानं हा बंगला ३९ कोटी रुपयांना खरेदी केला होता.
(5 / 6)

सचिन तेंडुलकर यांचं इंग्लंडमधील लंडन शहरातही घर आहे. त्याच्याकडं अनेक लक्झरी गाड्या आहेत. सचिनकडं २० कोटींहून अधिक किमतीच्या १० कार आहेत. महिन्याला ४ कोटी या हिशेबानं तो दिवसाला १३.३३ लाख रुपये कमावतो आणि मिनिटाला ५५ ते ५६ हजार रुपये मिळवतो.
(6 / 6)

    शेअर करा